चीनने पाकला सदोष ‘जेएफ्-१७’ लढाऊ विमाने देऊन फसवले !

पाकला चीनखेरीज दुसरा पर्यायही नसल्याने त्याचा पुरेपूर लाभ चीन उठवून पाकला फसवत आहे, हे पाकच्या नागरिकांना लक्षात येईल तो सुदिन !

इस्लामाबाद (पाकिस्तानी) – चीनने पाकला दिलेल्या ‘जेएफ्-१७’ या लढाऊ विमानांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. चीनकडून मिळालेली ही विमाने पाकसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सदोष इंजिन, अल्प क्षमता, तसेच त्यांच्या देखभालीसाठी येणारा खर्च यांमुळे पाकचे वायूदल त्रस्त झाले आहे.

जेएफ्-१७ विमानांच्या खरेदीसाठी पाकने वर्ष १९९९ मध्ये चीनसमवेत करार केला होता. या विमानांची तुलना सुखोई-३०, एम्.के.आय, मिग-२९ आणि मिराज-२००० यांच्यासमवेत केली जाते. करार करतांना चीनने या विमानाचे अनेक लाभ सांगितले होते; मात्र आता पाकला या विमानाचे तोटेच अधिक जाणवत आहेत. या विमानांमधील त्रुटींविषयी पाकने चीनकडे तक्रार केली; मात्र चीनने त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.