गलवान खोर्यातील संघर्षानंतर भारताकडून सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात ! – ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेचा दावा
लडाखमधील गलवान खोर्यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.