अफगाणिस्तानच्या कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर तालिबानकडून रॉकेटद्वारे आक्रमण

कंदहार (अफगाणिस्तान) – तालिबानकडून कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेटद्वारे आक्रमण करण्यात आले. एकूण ३ रॉकेट डागण्यात आली. त्यांपैकी १ विमानतळावर, तर २ धावपट्टीवर पडली. यामुळे विमानांची सर्व उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. यापूर्वीही ७ एप्रिल या दिवशी या विमानतळावर तालिबानकडून आक्रमण करण्यात आले होते.