पू. (श्रीमती) निर्मला दाते यांच्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या नामजपादी उपायांचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींच्या डोक्यापासून काही अंतरावर काही वेळ हात धरला, तेव्हा पू. आजींच्या चरणांची आपोआप हालचाल झाली. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांच्या हातातून प्रक्षेपित होत असलेली ईश्वरी ऊर्जा काही क्षणांतच पू. आजींच्या चरणापर्यंत पोचली. त्यामुळे पू. आजींच्या चरणांची हालचाल झाली’, असे मला जाणवले.