भारत देशाचे वेगळेपण !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ 

कुंभमेळ्यात आग लागून ‘लव-कुश आश्रम’ खाक !

कुंभमेळ्यात सेक्टर १९ मध्ये मोरी मार्गावरील अयोध्या धाम येथील ‘लव-कुश आश्रमा’ला आग लागून या आश्रमाचे पूर्ण शिबीर आगीत भस्मसात् झाले. १५ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५.४५ वाजता ही आग लागली.

पुणे विद्यापिठातील समस्या; विद्यार्थी परिषद मोर्चा काढणार !

समस्या सोडवण्यासाठी मोर्चा काढावा लागणे विद्यापीठ प्रशासनाला लज्जास्पद !

आतंकवाद्यांशी संबंध असणार्‍यांना फाशी द्या !

जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांनी एका पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचार्‍यांना आतंकवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून बडतर्फ केले आहे. ऑगस्ट २०१९ पासून अशा प्रकारे कारवाई झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांची संख्या आता ६९ झाली आहे.

संपादकीय : मोदी हेच ‘ट्रम्प’ कार्ड ?

आगामी ४ वर्षे भारत-अमेरिका संबंध अधिक सशक्त होणार असले, तरी रशियाला आश्वस्त करण्याचे आव्हान भारतासमोर असणारच !

जातीयवादी, पुरो(अधो)गामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना महाकुंभमेळ्यामुळे मिळालेली चपराक !

काही लोकांना महाकुंभात घाण आणि कचरा दिसला. काही लोकांना महाकुंभात रस्त्यावरील अडथळे आणि वाहतूक जाम झालेले दिसले. काही लोकांना महाकुंभात आध्यात्मिकता आणि दिव्यता दिसली…

कोट्यवधी लोकांनी स्नान करूनही गंगा नदीच्या पाण्यातील क्षारांविषयी आश्चर्यजनक संशोधन !

‘टोटल डिजॉल्व्ह सॉलिड्स’ (टी.डि.एस्.), म्हणजे पाण्यातील क्षार मोजण्याचे प्रमाण. ‘टी.डि.एस्. मीटर’ नावाच्या छोट्याशा यंत्राने ते मोजता येतात. पिण्याच्या पाण्याविषयी बोलायचे झाले, तर साधारणपणे १०० ते १५० ‘टी.डि.एस्.’ ही पातळी योग्य क्षार असलेली पातळी गणली जाते…

पटवर्धन सरकार यांच्या श्री मांदार गणेशाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा !

कागवाड येथील पटवर्धन सरकार कुटुंबियांचे जागृत उपास्य दैवत असलेल्या श्री मांदार गणेश मंदिराचा २० फेब्रुवारीपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण समारंभ होत आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’द्वारे पाश्चिमात्त्यांचे उदात्तीकरण पुण्यात सहन केले जाणार नाही ! – ऋषिकेश कामथे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’सारखे पाश्चिमात्यांचे उदात्तीकरण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यात सहन केले जाणार नाहीत, असे परखड प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. ऋषिकेश कामथे यांनी केले.

कुंभक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी भाविकांचे कर्तव्य !

‘मागील लेखात आपण विविध कुंभमेळ्यांच्या विविध तीर्थस्थळांचे महत्त्व जाणून घेतले. आज आपण कुंभमेळ्याच्या परिसरात घडणार्‍या अनुचित गोष्टी आणि त्याविषयी भाविकांचे कर्तव्य यांविषयी अधिक जाणून घेऊ.