
काही लोकांना महाकुंभात घाण आणि कचरा दिसला. काही लोकांना महाकुंभात रस्त्यावरील अडथळे आणि वाहतूक जाम झालेले दिसले. काही लोकांना महाकुंभात आध्यात्मिकता आणि दिव्यता दिसली. काही लोकांना महाकुंभात त्यांच्या आई-वडिलांचे आणि स्वतःचे स्वप्न साकार झालेले दिसले; पण कुणालाच दिसले नाही की, ५० कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली; पण एकाही हिंदूने कुणाच्या ज्यूस, रोटी किंवा चहात थुंकले नाही. असे असले, तरी कुणालाच दिसले नाही की, ५० कोटी हिंदूंनी महाकुंभाला भेट दिली; पण एका तरी हिंदूने इतर धर्मांच्या अस्तित्वाला आव्हान देत त्यांच्या वंशसंहाराचा नारा दिला नाही की, हिंदूने रस्त्यावर, रेल्वेमध्ये किंवा रेल्वेस्थानकांवर प्रार्थना करून इतरांना त्रास दिला नाही.
कुणालाच दिसले नाही की, महाकुंभात कोणतेही वेगळे घाट नव्हते, ना दलितांसाठी, ना ब्राह्मणांसाठी, ना जाटांसाठी, ना अग्रवालांसाठी. सर्व हिंदूंनी एकत्र स्नान केले, तेही कुठलाही जातीभेद न होता ! एवढेच नव्हे, तर एकही हिंदू उपाशी किंवा भरकटलेला राहिला नाही. ५० कोटी हिंदू महाकुंभात आले, तरीही कुठल्याही इतर धर्माच्या धार्मिक स्थळांवर नमाज किंवा प्रार्थनेच्या वेळी दगडफेक झाली नाही. यासह एका तरी हिंदूने कोणत्याही परदेशी व्यक्तीला धर्मांतरासाठी भाग पाडले नाही किंवा कुणाच्याही भूमीवर दावा केला नाही.
(साभार : विविध संकेतस्थळे)
अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !