
अयोध्या – श्रीराममंदिर उभारल्यापासून पर्यटक मोठ्या संख्येने अयोध्येत येत आहेत. श्रीराममंदिर पहाण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. श्रीराममंदिराच्या तुलनेत ७ आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला पर्यटक अल्पप्रमाणात भेट देत आहेत. श्रीराममंदिरात श्री रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ९ महिन्यांत ४७ कोटी लोकांनी भेट दिली. (श्रीराममंदिर हे राष्ट्रभावना आणि राष्ट्रीय अस्मिता यांच्याशी जोडलेले आहे, याचाच हा प्रत्यय नसेल कशावरून ? – संपादक) पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार ताजमहालला भेट देणार्या भारतीय पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ लाख ९३ सहस्र २९८ ने अल्प झाली आहे.