JNU Cancels Seminars : इराण, पॅलेस्‍टाईन आणि लेबेनॉन या देशांच्‍या भारतातील राजदूतांची ‘जे.एन्.यू.’मधील व्‍याख्‍याने रहित

मुळात या देशांच्‍या राजदूतांची व्‍याख्‍याने आयोजितच का करण्‍यात आली होती ? अशांना भारतात सार्वजनिक व्‍यासपीठ मिळाल्‍यास त्‍याचा वेगळा अर्थ जागतिक मंचावर जाईल, हे का लक्षात येत नाही ?

Kerala Gold Raid : केरळमध्‍ये ‘जीएस्‌टी’च्‍या सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या उत्‍पादकांवर धाडी : १२० किलो सोने जप्‍त ! 

अनेक उत्‍पादक कर न भरता सोन्‍याच्‍या व्‍यवहारात गुंतल्‍याचे या वेळी समोर आले. काही मालकांनी करचुकवेगिरी केली आहे. या धाडीत करचुकवेगिरीचे पुरावे सापडल्‍याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

 ‘BRICS’ Membership Denied To Pakistan : पाकला ‘ब्रिक्‍स’चे सदस्‍यत्‍व न मिळाल्‍याने पाकमधील जनतेत संताप !

पाकसह अनेक देशांनी ब्रिक्‍समध्‍ये सहभागी होण्‍यासाठी अर्ज केले होते. त्‍यातील केवळ १३ देशांना ब्रिक्‍सचे भागीदार बनवण्‍याची घोषणा करण्‍यात आली.

Bomb Threat Call : प्रवाशाला अडकवण्‍यासाठी विमानात मानवी बाँब असल्‍याच्‍या धमकीचा दूरभाष !

अशा धमक्‍या देऊन विमान व्‍यवस्‍था उलथवून टाकणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

Vishwaprasanna Theertha Swami : (म्‍हणे) ‘पेजावर स्‍वामींनी भगवे कपडे त्‍यागल्‍यास त्‍यांना धडा शिकवू !’ – बी.के. हरिप्रसाद, कांग्रेसचे आमदार

श्री विश्‍वप्रसन्‍न तीर्थ स्‍वामीजी हे सबंध हिंदु समाजाचे संत आहेत. त्‍यामुळे केवळ ब्राह्मणांनी नव्‍हे, तर सर्वांनीच त्‍यांना पाठिंबा दिला पाहिजे !

Slavery Reparations From UK : राष्ट्रकुल देशांनी ब्रिटनकडे मागितली गुलामगिरीची भरपाई

ब्रिटन आर्थिक संकटात असल्याने तो इतरांना काय भरपाई देणार ? अनेक शतके इतर देशांना लुटल्यानंतरही ब्रिटनची ही स्थिती म्हणजे ‘प्रत्येक देशालाही त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात’, असेच म्हणावे लागेल !

Flight Bomb Threats In India : देशात एकाच दिवसात ९५ विमानांना बाँबने उडवण्याची धमकी

देशभरातील ९५ विमानांना बाँबने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. यामध्ये २० एअर इंडिया, २० इंडिगो, २० विस्तारा आणि २५ आकाशा यांच्या विमानांचा समावेश आहे. याखेरीज ‘स्पाइसजेट’च्या ५ विमानांना आणि अलायन्स एअरच्या ५ विमानांनाही धमक्या मिळाल्या आहेत.

Amit Shah : सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा देशव्यापी स्मरणोत्सव साजरा होणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सरकार २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांचा देशव्यापी स्मरणोत्सव विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करणार आहे.

Pakistan Strong Oppose ZakirNaik : भारतातील पसार गुन्हेगार झाकीर नाईक याला पाकिस्तानमधील ख्रिस्त्यांचाही विरोध

झाकीर नाईक याची मानसिकता पाकिस्तान्यांनाही समजली, हे चांगले झाले. त्यामुळे झाकीर याचा मुखवटा उघड झाला आहे. झाकीर जगात कुठेही गेला, तरी त्याला आता मुसलमान महत्त्व देणार नाहीत आणि आता ख्रिस्ती राष्ट्रेही विरोध करतील !

एकूण मृत्यूंमधील सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे होत असल्याने रस्ते सुरक्षेला प्राधान्य द्या ! – अभय सप्रे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालय रस्ते सुरक्षा समिती

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या बैठकीत सूचना