नवी देहली – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सरकार २०२४ ते २०२६ या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांचा देशव्यापी स्मरणोत्सव विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २३ ऑक्टोबरला ही घोषणा केली. सरदार पटेल यांच्या भारतातील महान योगदानाचा गौरव करणे, तसेच काश्मीरपासून लक्षद्वीपपर्यंत राष्ट्राला एकत्रित करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे.