मतदानाची टक्केवारी वाढल्यावर भाजपला लाभ झाल्याचा अनुभव आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर – जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्रपक्ष यांना लाभ होतो. असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितपणे याचा लाभ होईल आणि महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापन होईल, अशी आमची अपेक्षा आहे. ज्याप्रकारे मतदानाची टक्केवारी वाढली आहे, त्यामुळे लोकांना सरकारविषयी आपुलकी वाटत असल्याचा याचा अर्थ होतो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ते म्हणाले की, महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री पदाविषयी अजून कुठलीही चर्चा झाली नसून निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून चांगला निर्णय घेऊ.