GT World Mall  : बेंगळुरूतील ‘जीटी वर्ल्‍ड मॉल’ला ७ दिवस बंद ठेवण्‍याची शिक्षा !

सुरक्षारक्षकाने त्‍यांना ‘पँट परिधान करून आल्‍यासच आतमध्‍ये प्रवेश देईन’, असेही म्‍हटले. पिता आणि पुत्र दोघेही सुरक्षा कर्मचार्‍याला वारंवार विनंती करूनही त्‍याने त्‍यांचे ऐकले नाही.

Sarsanghchalak Mohanji Bhagwat : कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

गेल्या २ सहस्र वर्षांत जगभरात वेगवेगळे प्रयोग केले गेले; पण ते भारताच्या पारंपरिक जीवनपद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. कोरोनानंतर जगाला कळले की, भारताकडे शांती आणि आनंद यांचा प्रशस्त मार्ग आहे, असे गौरवोेद्गार प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे काढले.

UK Leeds Riots : ब्रिटनमधील लीड्स शहरात निर्वासितांकडून प्रचंड हिंसाचार !

ब्रिटनमध्ये निर्वासित, म्हणजे धर्मांध मोठ्या प्रमाणात असल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. आता संपूर्ण युरोपालाच निर्वासितांच्या संदर्भात युद्धपातळीवर धोरण ठरवून त्यांच्या देशांच्या रक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते !

Muslim Marriage Law : आसाममध्ये लवकरच मुसलमान विवाहासंबंधी नवीन कायदा येणार ! – मुख्यमंत्री सरमा

अशा प्रकारे एकेका राज्यात धर्मनिहाय भेदभाव रहित करण्यापेक्षा केंद्रशासनानेच समान नागरी कायदा आणला पाहिजे !

Kanwar Yatra Uttarakhand : हरिद्वार (उत्तराखंड) येथेही दुकान मालकांना त्यांची नावे लिहिण्याचा आदेश !

उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.

Kanwar Yatra UP : कावड यात्रा मार्गांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या मालकांनी दुकानांवर त्यांची नावे लिहिवीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !

Microsoft Server Down : मायक्रोसॉफ्‍टच्‍या ‘विंडोज’मध्‍ये तांत्रिक बिघाड !

मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली ‘विंडोज’मध्ये अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि बँका यांचे काम १९ जुलैला ठप्प झाले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळातील २ सदस्यांवर कारवाईची मागणी !

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध, तसेच वाहतूक पोलिसांसमवेत १५ दिवस काम करण्याच्या अटी, शर्तीवर जामीन संमत केला होता. या विरोधात बाल न्याय मंडळातील २ अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे…

पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांचे समन्स !

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, समाजकल्याण, प्राप्तीकर विभाग, अतिक्रमण अशा विविध विभागांनी चौकशीला प्रारंभ केल्याचे समजते. पूजा खेडकर यांनी परीक्षेसाठी दिलेल्या विविध कागदपत्रांचीही चौकशी करण्यात येत आहे.

कल्याण येथे दरड कोसळली !

१५ जुलै या दिवशी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील कचोरे टेकडीचा काही भाग कोसळला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.