‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळा’च्या कर्मचार्‍यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर

‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘समाजसाहाय्य उपक्रमा’च्या अंतर्गत आयोजन

महाराणा प्रताप सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

राहुल गांधी यांनी संपूर्ण हिंदु समाजाला हिंसक आणि असत्य म्हणत संपूर्ण हिंदु  समाजाचा अपमान केला आहे आणि असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. वर्ष २०१० मध्ये तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हटले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ जागांसाठी १४ जणांचे आवेदन !

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २ जुलै या दिवशी एकूण १४ जणांनी आवेदन प्रविष्ट केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी आवेदन मागे घेण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर (पुणे) श्रावणी यात्रेसाठी प्रशासनाने सिद्ध रहावे ! – प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांचे आदेश

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेच्या काळात वाहनतळ आणि देवदर्शनाला येणार्‍या भाविकांची लूट थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी प्रयत्न करावेत. एस्.टी. महामंडळाने ‘मिनी बस’ची (लहान गाडी) संख्या वाढवून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, असे आदेश प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले.

‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेत राज्यात २० लाख ५० सहस्र लाभार्थींची वाढ ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

‘केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘पी.एम्. किसान सन्मान’ योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रतिवर्षी ६ सहस्र रुपये, तर यावर्षीपासून राज्यशासनाने चालू केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेतून ६ सहस्र रुपये, असे एकूण १२ सहस्र रुपये शेतकर्‍यांना दिले जातात.

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला खासदारकीची शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत !

अमृतपाल सिंह हा पंजाबमधील खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडून आला आहे. त्याला लोकसभेत शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत करण्यात आला आहे.

४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश विनामूल्य मिळणार  ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

महाराष्ट्र राज्यातील ४४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना विनामूल्य शालेय गणवेश योजनेचा लाभ होणार आहे. येत्या ३० जुलैपर्यंत सर्व शाळांमध्ये गणवेश पोचतील.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा प्रयत्न ! – शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री

याविषयी सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री कपिल पाटील, अमोल मिटकरी, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापतींना दिले दिलगिरीचे पत्र !

विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २ जुलै या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर ५ दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पद भरतीसाठी शासन सकारात्मक ! – मंत्री उदय सामंत

याविषयी लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत ३ जुलै या दिवशी प्रश्नोत्तरात दिली.