Muslim Marriage Law : आसाममध्ये लवकरच मुसलमान विवाहासंबंधी नवीन कायदा येणार ! – मुख्यमंत्री सरमा

विवाह नियमांमध्ये येणार समानता !

मुख्यमंत्री सरमा

गौहत्ती (आसाम) – मंत्रीमंडळाने मुसलमान विवाह कायदा १९३५ रहित करून नवीन कायदे करण्यास मान्यता दिली आहे. नवीन कायद्यामुळे विवाह आणि घटस्फोट यांच्या नियमांत समानता येईल, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी केले. ते म्हणाले की, बालविवाहासारख्या प्रथांवरही लगाम लागू शकेल. या विषयीच्या विधेयकावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा करू.

मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यावर १८ जुलैला सरमा म्हणाले की, बालविवाहाच्या विरोधात अतिरिक्त सुरक्षा उपाय योजण्यात येणार आहेत. विद्यमान कायदा मुसलमान मुलींना १८ वर्षांच्या आधी, तर मुलांना २१ वर्षांपूर्वी विवाह करू देतो.

फेब्रुवारी २०२३ मध्येच आसाम शासनाने आसाम मुसलमान विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा आणि वर्ष १९३५ चे नियम रहित करण्याचे मान्य केले होते. यावर विरोधकांनी हे पाऊल मुसलमानांशी भेदभाव करणारे असल्याचे म्हटले होते.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारे एकेका राज्यात धर्मनिहाय भेदभाव रहित करण्यापेक्षा केंद्रशासनानेच समान नागरी कायदा आणला पाहिजे !