आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विविध गुन्हे शिर्डी येथे वर्ग !
प्रभु श्रीरामाविषयी वादग्रस्त विधानाचे प्रकरण
प्रभु श्रीरामाविषयी वादग्रस्त विधानाचे प्रकरण
नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या समन्वयातून शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवरील चौकांमध्ये (सिग्नल) वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘अभिवन योजना’ राबवण्यात येणार आहे.
विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षाला मतदान करणारे ५ आमदार झिशान सिद्दीकी, हिरामण खोसकर, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यापासून सामाजिक माध्यमांवर धर्मांधांकडून चिथावणीखोर वक्तव्ये प्रसारित करण्यात येत आहेत. ‘एकच मिशन कोल्हापूर’, अशा आशयाचे ‘स्टेटस’ लावण्यात आले होते. तरी अशा संशयितांवर पोलिसांनी अन्वेषण करून कारवाई करणे अपेक्षित होते.
येथील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठलाच्या मूर्तीवरील मुकुटाची चोरी झाली आहे. या प्रकरणी प्रकाश शर्मा (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.
सातारा येथील प्रतापगडाच्या विकासासाठी राज्यशासनाने ‘प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली आहे. भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हे प्राधिकरण काम करणार आहे.
मुंबई – येस बँकेच्या उपव्यवस्थापक प्रगती अतुल क्षीरसागर (वय २७ वर्षे) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाइन घोटाळेबाजांसाठी त्यांनी बँक खात्यांची सुविधा केली होती.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा दर्जा आणि निवडणूक चिन्ह यांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून राज्यस्तरीय पक्ष म्हणून दर्जा दिला आहे,..
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने म्हटले आहे की, ती पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर रोव्हर पाठवण्याची मोहीम रहित करत आहे. खर्चात वाढ आणि प्रक्षेपणाला होणारा विलंब यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’तून छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात पोचली आहेत. ही वाघनखे १९ जुलैपासून सातार्यात प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.