राज्यभरात हाताने मैला काढण्याच्या पद्धतीमुळे ८१ कामगार दगावले !

या संदर्भात ‘श्रमिक जनता संघा’च्या वतीने याचिका करण्यात आली आहे. याची गंभीर नोंद न्यायालयाने घेतली आहे.

४ आस्थापनांची २७ सहस्र कोटी रुपयांची निविदा कायम !

महावितरण आस्थापनाने काढलेल्या निविदांना ७ ऑगस्ट २०२३ या दिवशीच मान्यता मिळाली असून त्यानुसार संबंधित पुरवठादारांना संमतीपत्रही देण्यात आले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात साजरी !

या वेळी ‘ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, उपाध्यक्ष श्री. भवरास्कर, तसेच डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्यासह देशातील विविध भागांतून आलेले भक्त आणि भाविक उपस्थित होते.

छल्लेवाडा (चंद्रपूर) येथील अंगणात झोपली असता पेटवून दिलेली व्यक्ती अखेर मृत !

घरासमोरील अंगणात झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर १ जूनच्या मध्यरात्री अज्ञात आरोपीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना २ जून या दिवशी अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या गावात घडली होती.

पुणे शहरात पुन्हा रक्ताचा तुटवडा !

झिका, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आता शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने ‘प्लेटलेट्स’ची मागणीही वाढली आहे.

निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी आणि शिवप्रेमी अन् निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयात देण्यात आले.

गोरंबे (कोल्हापूर) येथील मठाधिपती प.पू. अमृतानंद महाराज अनंतात विलीन !

कागल तालुक्यातील ‘विश्वात्मक गुरुदेव जंगली महाराज आश्रम’, गोरंबे येथील मठाधिपती प.पू. अमृतानंद महाराज यांना १३ जुलैला देवाज्ञा झाली. त्यांचे पार्थिव आश्रम परिसरातच दहन करण्यात आले.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे करण्यात आला ‘चामुंडा होम’ !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आणि कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे ‘चामुंडा होम’ करण्यात आला. रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि ब्रह्मसरोवर, कुरुक्षेत्र येथील ….

गडचिरोली आणि चंद्रपूर येथे धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

नगरपरिषद परिसरात, तसेच शहरात पाणी साचले होते. नागरिकांनी पाण्यातून मार्ग काढला. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची चर्चा नागरिकांत होती.

राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती विभागाला सूचना !

या पार्श्वभूमीवर एस्.डी.आर्.एफ्., जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी साहाय्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.