राहुल गांधींना आषाढी वारीत सहभागी होण्यास भाजपचा विरोध ! – रणजितसिंह निंबाळकर, भाजप

निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भोळ्याभाबड्या वारकर्‍यांची दिशाभूल करण्यासाठी राहुल गांधी वारीत सहभागी होणार असतील, तर आम्ही त्यांचा निषेध आणि विरोध करतो, असे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले आहे.

शेअर मार्केटच्या लोभाने ९ लाख ४८ सहस्र रुपयांची फसवणूक !

लोभामुळे आमिषांना फसल्यानंतर फसवणूक होण्याची अनेक प्रकरणे समोर येत असूनही अशी प्रकरणे वारंवार घडतात, यातून फसवणूक करणार्‍यांवर प्रशासनाचा अंकुश नाही, हेच लक्षात येते.

श्रावण महिना आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ देण्याच्या विचाराधीन !

आगामी श्रावण महिना आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर आता त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ‘ऑनलाईन पास’ देण्याच्या विचाराधीन आहे.

कोल्हापूर येथील उद्योजक महेश उत्तुरे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान !

उद्योजक महेश उत्तुरे यांना गोवा सरकारच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. गोवा येथे झालेल्या सोहळ्यात ‘इन्फोटेक’ महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते उत्तुरे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

३० जूननंतरही टँकर चालू ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

पाऊस न पडल्याने राज्याच्या ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. राज्यातील एकाही तालुक्यात किंवा खेड्यात कुणीही पाण्यापासून वंचित रहाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल….

पुणे येथे बलात्कार प्रकरणी वासनांधावर गुन्हा नोंद !

एका अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी घोषित झालेली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. अर्ज प्रविष्ट केलेल्या मुख्य उमेदवारांपैकी एकानेही माघार न घेतल्यामुळे १२ जुलै या दिवशी ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाआघाडीकडून ‘इंद्रायणी बचाव एल्गार’ आंदोलन करत इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी !

इंद्रायणी नदीला पुनरुज्जीवित करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काळात जनआंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी महाविकास आघाडीतील पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

मुंबईत पहाटे दोन तरुणांना धडक देणार्‍या चालकाला ५ दिवसांनंतर अटक !

५ दिवसांनी अटक केल्याने आरोपीने अपघाताच्या वेळी दारूचे सेवन केले होते का, हे कसे लक्षात येणार ?’, असा आरोपही तरुणाच्या वडिलांनी केला.