माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हरितक्रांतीचे जनक, बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची १ जुलै या दिवशी जयंती साजरी करत आहोत.

काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी हिंदूंविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी ! – हिंदु जनजागृती समिती

आज संसदेत राहुल गांधी यांनी हिंदूंचा ‘हिंसाचारी’ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

आषाढी यात्रेसाठी ११ लाख लाडू !

आषाढी एकादशीला बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून खाता येत नसल्याने ५ लाख राजगिर्‍याचे लाडू बनवण्याचेही कामही चालू आहे.

बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणी नागपूरच्या माजी भूमी अभिलेखाच्या उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा नोंद !

बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी नागपूर भूमी अभिलेखाचे तत्कालीन सेवानिवृत्त उपसंचालक दादाभाऊ तळपे यांच्यासह त्यांच्या पत्नी कल्पना तळपे यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २९ जूनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परळ आणि मालाड येथे ३ सहस्र रुपयांत पारपत्र दिल्याप्रकरणी १४ अधिकार्‍यांसह ३२ जणांविरोधात गुन्हे नोंद

मालाड आणि लोअर परळ येथील पारपत्र मिळण्याच्या केंद्रातून २ ते ३ सहस्र रुपयांमध्ये अधिकारी पारपत्र देत आहेत.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार ?

योजनेनुसार प्रतिमहिना १ सहस्र ५०० रुपये महिलांच्या थेट अधिकोष खात्यांमध्ये जमा होणार आहेत.

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन काम करत असून येत्या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

डिलाईट इंडस्ट्रीज, रत्नागिरीचे उद्योजक अनिल देवळे यांना सुरेश प्रभु यांच्या हस्ते देण्यात आला ‘जिल्हा उद्योजकता पुरस्कार’

जिल्हा उद्योजक फेडरेशनच्या वतीने येथील डिलाईट इंडस्ट्रीजचे उद्योजक श्री. अनिल देवळे यांना श्री. सुरेश प्रभु यांच्या हस्ते जिल्हा उद्योजक पुरस्कार देण्यात आला.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांना बोलू न दिल्याने विरोधकांचा सभात्याग !

उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी त्यांना सभागृहात बोलू न दिल्यामुळे परिषद सभागृहातून विरोधकांनी सभात्याग करत निषेध व्यक्त केला.

७५ सहस्र कामगारांवर अन्याय करणार्‍या निविदा प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देणार ! – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई येथील झोपडपट्टीमधील स्वच्छतेचे काम सामाजिक संस्थांकडून काढून घेऊन एका कंत्राटदाराला ४ वर्षांसाठी देण्याचा घाट मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी वरिष्ठाच्या पाठबळामुळे घातला होता.