आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी करून भक्तीमय वातावरणात स्वागत

येथे ३० जुलैला सायंकाळी सवा ६ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी नगर परिषद चौकात माऊलींच्या जयघोषात, वरुणराजाच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले.

‘शिधापत्रिका संगणक प्रणाली’तील त्रुटी दूर करून ऑगस्ट महिन्यात योग्य धान्य वाटप करा ! – ठाकरे गटाचे निवेदन

पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी, ‘एकही शिधापत्रिकाधारक धान्य मिळण्यापासून वंचित रहाणार नाही. हे धान्य मिळाल्याची सूची दुकानदारांकडून घेऊ’, असे आश्वासन दिले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गणेशोत्सवासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार !; चारचाकीच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू !…

गणेशोत्सवाच्या काळातील रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या काळात कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने २० अतिरिक्त रेल्वेगाड्यांच्या फेर्‍या सोडण्याची घोषणा केली आहे.

मराठवाड्यातील देवस्थानच्या भूमींच्या मालकी हक्काचा तिढा सुटण्यासाठी राज्यशासन भूमी विक्रीयोग्य करणार !

मराठवाड्यामध्ये निजामकाळात नागरिकांना कसण्यासाठी देण्यात आलेल्या अनेक देवस्थानच्या भूमींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या भूमींतून देवस्थानला काहीही उत्पन्न मिळत नाही, तसेच मालकी हक्क नसल्यामुळे …

पुणे येथील कात्रज परिसरात २१ लाख रुपयांचे मॅफेड्रोन जप्त !

अमली पदार्थ विक्रीचे प्रकार कायमस्वरूपी बंद होण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार आहेत ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – प्रकाश महाजन, मनसे नेते

अकोला येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ गणेशमूर्तीच्या निर्मितीवर कडक बंदी घाला !

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’) गणेशमूर्ती निर्मिती बंदीच्या कडक कार्यवाहीसाठी मुंबई उच्च न्यायालयात १२ याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. यामध्ये ९ मूर्तीकार आणि ३ पर्यावरणवादी कार्यकर्ते आहे.

राज्यभर ‘महिला हरिपाठ मंडळां’ची स्थापना करणार ! – मालुश्री पाटील, राज्य अध्यक्षा, वारकरी साहित्य परिषद

गेल्या काही मासांत राज्यातील ३६ जिल्ह्यांत मोठ्या संख्येने मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत मंडळे कार्यरत झाली आहेत.

Pooja Khedkar UPSC : यू.पी.एस्.सी.ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रहित केली !

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी ‘यू.पी.एस्.सी.’ने (केंद्रीय लोकसेवा आयोगाने) (UPSC) रहित केली आहे. त्यांना यापुढे आयोगाकडून घेण्यात येणार्‍या कोणत्याही परीक्षेस बसता येणार नाही.

दरड कोसळल्याने सिंहगडावरील पर्यटन बंद !

पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या सिंहगडाचे पर्यटन काही दिवस बंद केले आहे. दगड-मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.