UK Leeds Riots : ब्रिटनमधील लीड्स शहरात निर्वासितांकडून प्रचंड हिंसाचार !

  • पोलिसांची वाहने पेटवली !

  • मोठ्या प्रमाणात जाळपोळ !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या लीड्स शहरामध्ये निर्वासितांकडून मोठ्या प्रमाणावर १८ जुलैच्या सायंकाळनंतर हिंसाचार करण्यात आला. यात जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांसह सार्वजनिक बसगाड्या आणि वैयक्तिक वाहने यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दुकानांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात जीवित हानी झाली नाही.

१. पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, १८ जुलैला स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता लीड्समधील हरेहिल्स भागातील लक्सर स्ट्रीटवर लोकांची गर्दी जमू लागली. यानंतर काही वेळातच जमाव चिडला. या गर्दीत लहान मुलांचाही समावेश होता. आता परिस्थिती सामान्य झाली आहे; मात्र लोकांना आवश्यकतेविना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

२. ब्रिटनच्या गृहमंत्री यवेट कूपर यांनी सांगितले की, या हिंसाचारामुळे मला धक्का बसला आहे. मी स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. ब्रिटनमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही.

काय आहे प्रकरण ?

ब्रिटनच्या बाहेरून आलेले निर्वासित या भागात रहातात. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. ब्रिटनमधील ‘चाइल्ड केअर’ यंत्रणेला शंका आहे की, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते त्यांच्या मुलांची योग्य काळजी घेत नाहीत. यामुळे ही यंत्रणा या मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करून बालसुधारगृहात ठेवणार आहे; मात्र त्यासाठी पालक आणि मुले सिद्ध नाहीत. या यंत्रणेने मुलांना सुधारगृहात नेण्याचा प्रयत्न केल्यावर लोकांनी त्याला विरोध करत हिंसाचार केला.

संपादकीय भूमिका 

  • ब्रिटनमध्ये निर्वासित, म्हणजे धर्मांध मोठ्या प्रमाणात असल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. आता संपूर्ण युरोपालाच निर्वासितांच्या संदर्भात युद्धपातळीवर धोरण ठरवून त्यांच्या देशांच्या रक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यावरून लक्षात येते !
  • भारताला धर्मांधांच्या हिंसाचारावर आतापर्यंत सल्ले देणारे पाश्‍चात्त्य देश जात्यात आले असल्याने त्यांना भारताचे दुःख लक्षात येईल, अशीच अपेक्षा !