मोगलांना भिडणारे मावळे निर्माण करण्याचे कार्य करत आहोत ! – सुनील पवार, अध्यक्ष, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती

२८ जुलैला पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा ‘शिवसन्मान पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला.

ऐन पावसात कॅबचालकांकडून अधिक दर आकारणी आणि बुकिंग रहित करण्यामुळे प्रवाशांना मनस्ताप !

पावसाने पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांची दाणादाण उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

पुणे येथे चारित्र्यावर संशय घेत महिला पोलीस कर्मचार्‍याच्या हत्येचा प्रयत्न  करणार्‍या पतीला अटक !

चारित्र्यावर संशय घेत पतीने महिला पोलीस कर्मचार्‍याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ जुलैला पहाटे विश्रांतवाडी परिसरात घडली.

नवी मुंबई येथील तरुणींच्या हत्यांचे खटले जलद गती न्यायालयात चालवावेत ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, या प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपी वाचणे शक्य नाही. नवी मुंबई पोलीस त्यांचे काम करत आहेत.

पंचगंगेतील अतिक्रमण, नदीतील गाळ न काढणे यांमुळे महापूर ! – उदय गायकवाड, पर्यावरणतज्ञ 

आताचा पूर येण्याच्या अगोदर शहरातील कोणत्याही धरणातून विसर्ग चालू नव्हता. पंचगंगेचे पाणी पुढे वहात होते आणि पुढे असलेल्या हिप्परगी आणि आलमट्टी या धरणातून पाण्याचा विसर्ग चालू होता.

‘कोचिंग सेंटर्स’ हा एक प्रकारचा मोठा धंदा झाला आहे !

हे देशातील राज्य सरकारांना आतापर्यंत का लक्षात आले नाही ? त्यांनी अशा ‘कोचिंग सेंटर्स’वर कारवाई का केली नाही ? आताही ते याविषयी काही करणार आहेत का ?

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य कौतुकास्पद !

कैलास आश्रम महासंस्थानचे जयेंद्रपुरी महास्वामी आणि हरिहरपूर मठाचे जगद्गुरु श्री श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद !

(म्हणे) ‘मणीपूरसारखी स्थिती महाराष्ट्रातही होईल का ?’ – शरद पवार

महाराष्ट्रात दंगलींची भाषा करण्याविषयी वक्तव्य करून शरद पवार एकप्रकारे दंगलखोरांना प्रोत्साहनच देत आहेत, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

कोल्हापूरच्या पूर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही नाही ! – बाजीराव खाडे, निमंत्रक, पूरग्रस्त समिती

वर्षानुवर्षे गंभीर होत चाललेल्या पूर परिस्थितीमुळे बागायती क्षेत्रासमवेत निवासी, व्यापारी, व्यावसायिक क्षेत्राची पुष्कळ मोठी हानी होत आहे. मानवनिर्मित चुकीच्या विकासकामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे.