बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही ! – दलाई लामा

बोधगया (बिहार) – चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले. येथे कालचक्र मैदानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दलाई लामा पुढे म्हणाले की, चीनने अनेक बौद्ध मठांना नष्ट केले, तरीही चीनमध्ये बौद्ध धर्माला मानणार्‍यांची संख्या न्यून झाली नाही. आजही तेथे अनेक बौद्ध मठ अस्तित्वात आहेत आणि लोकांचा या धर्मावर विश्‍वास आहे.