शिंदे गटाने कागदपत्र सादर करण्‍यासाठी मुदत वाढवून मागितली !

शिवसेनेच्‍या आमदारांच्‍या पात्रतेविषयी २१ नोव्‍हेंबर या दिवशी विधानसभेचे अध्‍यक्ष अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांच्‍यापुढे विधानसभेत सुनावणी झाली. या वेळी एकनाथ शिंदे यांच्‍या गटाकडून कागदपत्रे सादर करण्‍याची मुदत वाढवून मागितली.

सरकारी अधिवक्‍त्‍यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे न्‍यायालयासमोर सादर न केल्‍याने त्‍यांना १ रुपया दंड करावा ! – अधिवक्‍ता अनिल रुईकर

कॉ. गोविंद पानसरे प्रकरणाची २१ नोव्‍हेंबरला न्‍यायालयात नियमित सुनावणी होती. सुनावणी चालू झाल्‍यावर एका साक्षीदाराला साक्षीसाठी बोलावण्‍यात आले होते. ज्‍या विषयाच्‍या संदर्भातील साक्ष होती, त्‍याची मूळ कागदपत्रेच नसल्‍याचे विशेष सरकारी अधिवक्‍ता हर्षद निंबाळकर यांच्‍या लक्षात आले.

स्वार्थी मनुष्य !

‘भूतलावर सर्व प्राणी दुसर्‍यांसाठी जगतात. प्राणी, वनस्पती हे इतरांना काही ना काही देत असतात. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की, जो केवळ स्वतःसाठी जगत असतो. तो निसर्ग, प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून सतत घेतच असतो. मनुष्याच्या या स्वार्थामुळेच तो इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त दुःखी असतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केंद्र सरकारच्‍या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य

ऊस आंदोलन प्रकरणी सरकार केंद्र सरकारच्‍या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! या संदर्भात जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नेमली असून ऊस दर आंदोलनावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्‍यास चालकांना प्रतिबंध !

एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्‍हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्‍ये चालकाकडून घडल्‍यास त्‍यांच्‍यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्‍याचे निर्देश एस्.टी. प्रशासनाने दिले आहेत.

दुबईतील आस्‍थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू ! – मुख्‍यमंत्री

प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्‍यकता भासल्‍यास दुबईतील आस्‍थापनाशी संपर्क करून कृत्रिम पाऊस पाडू, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले. पालिकेच्‍या कामांचा आढावा घेण्‍यासाठी ते स्‍वतः आणि पालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल उपस्‍थित होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद; निकृष्‍ट जेवण देणार्‍या कंत्राटदारांना ५ लाख रुपये दंड होणार !…

मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्‍यान धावणार्‍या ‘वंदे भारत’ रेल्‍वेगाड्यांमध्‍ये निकृष्‍ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्‍वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्‍कम २५ सहस्र रुपये होती.

भाव-भावनांतील दुजाभाव !

उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्‍खलन अशा अनेक आपत्ती येण्‍याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्‍याने वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या येणार्‍या अडथळ्‍यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्‍य आहे का ?’, याचेही चिंतन करण्‍याची वेळ आली आहे.

पोलीस दल कि वासनांधांचा अड्डा ?

पोलीस ज्‍या गुन्‍ह्यांसाठी गुन्‍हेगारांना पकडतात, तेच गुन्‍हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्‍ट्राला अत्‍यंत लज्‍जास्‍पद !

भारतातील निवडणुकांची लज्‍जास्‍पद स्‍थिती !

राजस्‍थान, मिझोराम, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या ५ राज्‍यांतील विधानसभांच्‍या निवडणुकांच्‍या कालावधीत आतापर्यंत १ सहस्र ७६० कोटी रुपयांची दारू, अमली पदार्थ, रोख रक्‍कम आणि महागडे धातू जप्‍त करण्‍यात आले आहेत.