दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद; निकृष्‍ट जेवण देणार्‍या कंत्राटदारांना ५ लाख रुपये दंड होणार !…

समाजातील नैतिकता, संयम नष्‍ट झाल्‍याचे दर्शवणारी घटना !

माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद

कल्‍याण – ६ वर्षांपूर्वी निलंबित केल्‍याचा राग मनात धरून माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍या ५ जणांविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. अशोक प्रधान हे मुंबईतील रूपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुंबई विद्यापिठाचे प्र-कुलगुरु होते. सहा वर्षांपूर्वी त्‍यांनी छत्रपती शिक्षण मंडळातील शिक्षक संजय जाधव यांना निलंबित केले होते.


रेल्‍वेचा स्‍तुत्‍य निर्णय !

निकृष्‍ट जेवण देणार्‍या कंत्राटदारांना ५ लाख रुपये दंड होणार !

मुंबई – मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्‍यान धावणार्‍या ‘वंदे भारत’ रेल्‍वेगाड्यांमध्‍ये निकृष्‍ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्‍वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्‍कम २५ सहस्र रुपये होती.


धर्मांध चोरट्यांना कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !

नागपूर येथे धर्मांध चोरटा अटकेत !

नागपूर – शेख फिरोज या चोराने नवीन घरात दूरचित्रवाणीसंच नसल्‍याने घरफोडी करून ३ दूरचित्रवाणीसंच, शेगडी आणि इतर घरगुती साहित्‍य चोरले. पोलिसांना याचा सुगावा लागल्‍याने त्‍यांनी धर्मांध चोराला अटक केली.


राज्‍यात ‘इन्‍फ्‍लूएन्‍झा’चे रुग्‍ण वाढले !

मुंबई – वातावरणातील पालट, संसर्ग या कारणांमुळे राज्‍यात ‘इन्‍फ्‍लूएन्‍झा’चा ताप वाढत आहे. १ जानेवारी ते १८ नोव्‍हेंबर या कालावधीमध्‍ये राज्‍यात ३ सहस्र २०६ रुग्‍णसंख्‍येची नोंद झाली. १५ लाख ४४ सहस्र ४२८ इतकी संशयित रुग्‍णसंख्‍या नोंदवण्‍यात आली. ‘इन्‍फ्‍लूएन्‍झा’मुळे सध्‍या ३५ जणांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत, अशी माहिती आरोग्‍य विभागाने दिली.


दिवसेंदिवस समाजात वाढणारी गुन्‍हेगारी वृत्ती धोकादायक !

पैसे न दिल्‍याने मालकाच्‍या मुलीचे अपहरण !

मुलगी सुखरूप

नागपूर – शेतीचे पैसे न दिल्‍याने घरकाम करणार्‍या नोकर दांपत्‍याने मालकाच्‍या १२ वर्षीय मुलीचे अपहरण केले. जिल्‍ह्यातील लोणार येथे ही घटना घडली. पोलिसांनी शोध घेतल्‍यावर काही घंट्यांत मुलगी सुखरूप सापडली. तिला पालकांकडे सोपवण्‍यात आले. या प्रकरणी मध्‍यप्रदेश येथून दांपत्‍याला अटक करण्‍यात आली आहे.