
मुंबई – एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एस्.टी. प्रशासनाने दिले आहेत.
एस्.टी. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले म्हणाले की, एस्.टी.चा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासार्हता जपण्यात एस्.टी.च्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणार्या चालकांचा मोठा वाटा आहे. गेल्या काही दिवसांत एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे, हेडफोन घालून गाणी ऐकणे, ‘व्हिडिओ’ पहाणे अशा चालक अन् प्रवासी यांच्या दृष्टीने धोकादायक कृत्यामुळे बसमधील प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते. याविषयी सामाजिक माध्यमांतून, लोकप्रतिनिधींकडून तक्रारी एस्.टी. महामंडळाकडे प्रविष्ट झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे निर्देश एस्.टी.च्या वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !