कोल्हापूर – राज्यातील सरकार हे शेतकर्यांचे हिताचे सरकार आहे. पीक विमा कर्ज, नियमित कर्ज भरणार्यांना शेतकर्यांना ५० सहस्र रुपयांची सवलत, तसेच शेतकर्यांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. त्यामुळे ऊस आंदोलन प्रकरणीही सरकार केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! या संदर्भात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून ऊस दर आंदोलनावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते २१ नोव्हेंबरला अचानक श्री महालक्ष्मीदेवीचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने यांसह अन्य उपस्थित होते.