सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण

रुग्णालयातील सुरक्षारक्षकाला मारहाण करणार्‍यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करावा, अन्यथा सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू’, अशी चेतावणी सुरक्षारक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे.

गोवा : साळ नदीच्या पात्रातील अनधिकृत बांधकाम पाडण्याचा न्यायालयाचा आदेश

अतिक्रमण होईपर्यंत स्थानिक प्रशासन काय करत होते ? त्यांनी हे अनधिकृत बांधकाम का पाडले नाही ?

गोवा : मंदिरातील चोरीच्या प्रकरणी आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा वरिष्ठ न्यायालयाकडून कायम

श्री सतीदेवी मंदिरात १९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी दानपेटी फोडून आतील ११ सहस्र ८१० रुपये चोरीला गेले होते. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित सुदन याच्या विरोधात गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

हिंदूंसाठी हे लज्जास्पद !

‘निवडणुकीत ईश्वर उभा राहिला, तरी बहुसंख्य हिंदू त्याला मत देणार नाहीत; कारण तो कोणतीच खोटी आश्वासने देत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विविध नेत्‍यांनी केेलेल्‍या ‘हेट स्‍पीच’च्‍या विरोधात कोल्‍हापूर जिल्‍ह्यात २ ठिकाणी तक्रारी !

विविध नेत्यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याच्‍या विरोधात (‘हेट स्‍पीच’च्‍या) गुन्‍हा नोंद करावा, या मागणीसाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यात शाहूवाडी आणि इचलकरंजी अशा २ ठिकाणी तक्रारी देण्‍यात आल्‍या.

पारंपरिक कारागिरांना सन्‍मान, सामर्थ्‍य, समृद्धी देणारी ‘प्रधानमंत्री विश्‍वकर्मा’ योजना ! – प्रा. अनिल सोले

समाजातील पारंपरिक कारागिरांना सन्‍मान, सामर्थ्‍य आणि समृद्धी देणारी ‘प्रधानमंत्री विश्‍वकर्मा’ योजना असल्‍याचे प्रतिपादन ‘प्रधानमंत्री विश्‍वकर्मा’ योजना महाराष्‍ट्र प्रदेश प्रमुख प्रा. अनिल सोले यांनी केले.

लव्‍ह जिहादविरोधात कठोर कारवाई करावी !

‘लव्‍ह जिहादच्‍या माध्‍यमातून हिंदु युवतींचे शोषण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्‍हावी’, तसेच अशा घटना रोखण्‍यासाठी कठोर असा लव्‍ह जिहादविरोधी कायदा करावा, याविषयी जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्‍या वतीने निवेदन देण्‍यात आले.

‘रॉयल्‍टी’च्‍या नावावर खोट्या पावती पुस्‍तकांद्वारे महसूल विभागाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

गौणखनिजांवरील ‘रॉयल्‍टी’ (स्‍वामीत्‍वधन) भरण्‍याचे खोटे पावती पुस्‍तक छापून महसूल विभागाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्‍याचे काम डंपर व्‍यावसायिकांकडून केले जात आहे. दिवसाला दीड ते दोन सहस्र डंपर अशा पावत्‍यांचा वापर करून मुंबईत प्रवेश करतात.

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांच्‍या ‘अपत्‍यप्राप्‍ती’च्‍या विधानावर संगमनेर न्‍यायालयामध्‍ये सुनावणी

ह.भ.प. इंंदुरीकर महाराज यांनी फेब्रुवारी २०२० मध्‍ये शिर्डी येथील ओझरमधील कीर्तनात ‘सम तिथीला स्‍त्रीसंग केल्‍यास मुलगा आणि विषम तिथीला स्‍त्रीसंग केल्‍यास मुलगी होते’, असे ते विधान होते. त्‍यांच्‍यावर ‘गर्भलिंग निदान निवडी’चे विज्ञापन केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.