कोल्हापूर – तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन आणि द्रमुकचे खासदार ए. राजा, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात (‘हेट स्पीच’च्या) गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी आणि इचलकरंजी अशा २ ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या.
१. शाहूवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. विजय लाटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिल कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. अजय गुरव, माजी नगराध्यक्ष श्री. राजू भोपळे, माजी उपनगराध्यक्ष श्री. उदयसिंह कोकरे-देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, श्री. विश्वास पाटील उपस्थित होते.
२. इचलकरंजी येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार नीलेश पाटील यांनी तक्रार स्वीकारली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे, सर्वश्री आनंदा मकोटे, विनोदकुमार ओझा, निखिल खोत उपस्थित होते.
३. निपाणी (कर्नाटक) येथे श्री. अभिनंदन भोसले यांनी निपाणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार मंडल पोलीस निरीक्षक बी.एस्. तलवार यांनी स्वीकारली. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेश आवटे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. अजित पारळे, ‘सद़्गुरु त्वायक्वांदो स्पोर्टस् अॅकॅडमी’चे संस्थापक श्री. बबन निर्मळे, धर्मप्रेमी सर्वश्री शेखर पुणेकर, शंकर पाटील, प्रवीण सूर्यवंशी, साईनाथ खोत, मल्लिकार्जुन जोडगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल बुडके आणि श्री. योगेश चौगुले उपस्थित होते.