‘फेअरनेस क्रीम’ लावूनही मला त्याचा काहीही लाभ झाला नाही ! – अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी

‘फेअरनेस क्रीम’मुळे गोरेपणा येत असल्याचा दावा केला जातो; प्रत्यक्षात त्यातून ‘लाभ अत्यल्प आणि ग्राहकांची फसवणूकच अधिक होते’, असा अनेकांचा अनुभव आहे ! तसेच त्याचे अन्य दुष्परिणाम होतात ते वेगळेच ! त्यामुळे सरकारने अशा उत्पादनांवर स्वतःहून कारवाई केली पाहिजे !

युरोपमधील साम्यवादी विचारवंत झिझेक याने श्रीमद्भगवतगीतेला ‘जगातील अश्‍लील पुस्तक’ संबोधले !

‘गाढवाला गुळाची चव काय ?’ असे म्हटले जाते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांवर अशी टीका केली जाते ! स्वतःला नास्तिकतावादी म्हणणारे साम्यवादी विचारवंत ‘जिहादी आतंकवादी कोणत्या पुस्तकामुळे बनतात ?’ आणि ‘चर्चमधील पाद्री वासनांध का बनतात ?’, यांविषयी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना साहाय्य करणार्‍या ४७ जणांना देशभरातून अटक

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करावा !

HR & CE ministry BJP Tamilnadu : तामिळनाडूत निवडून आल्यास हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय बंद करू ! – भाजप

राज्यातील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी भाजप सत्तेत आल्यास काय करेल?, यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. श्रीरंगम् येथील फेरीच्या वेळी त्यांनी घोषणा केली की, आम्ही सत्तेत येताच ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी मंत्रालय’ रहित करू.

झारखंड येथे इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक

काँग्रेसच्या काळात हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र या देशात आतंकवादी केवळ धर्मांध मुसलमानच असून तेच आतापर्यंत यात सापडत आहेत !

Pakistan firing soldier killed : जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या एका सैनिकाचा मृत्यू !

हमास इस्रायलवर आक्रमण करत असून दोघांमध्ये घनघोर युद्ध चालू आहे. याच कालावधीत पाक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करू लागला आहे. यातून येणार्‍या काळात भारतावरही जिहादी आतंकवाद्यांकडून अशा आक्रमणाची शक्यता नाकारता येणार नाही !

राजधानीतील अतिक्रमण न केलेले वनक्षेत्र ‘संरक्षित जंगल’ म्हणून घोषित करा ! – देहली उच्च न्यायालय

न्यायमूर्ती जसमित सिंह यांनी देहलीच्या वनक्षेत्राचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याविषयी देहली सरकारवर ताशेरे ओढले.

निबंध लिहितांना उत्स्फूर्तपणे भावनिक होणे आणि देशभक्ती अनुभवणे स्वाभाविक असू शकते ! – मद्रास उच्च न्यायालय

महिला उमेदवाराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा !
निबंधाच्या शेवटी ‘जय हिंद’ लिहिल्याने तमिळनाडू लोकसेवा आयोगाने अवैध ठरवली होती उत्तरपत्रिका !

हमासचे आतापर्यंत ६० कमांडर ठार, तर १३० बोगदे उद्ध्वस्त !

इस्रायलने हमासच्या विरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत हमासचे ६० नेते आणि कमांडर यांना ठार मारले आहे. यासह हमासचे १३० बोगदेही नष्ट केले आहेत. गाझा पट्टीतील गाझा शहरातील अर्ध्या भागावर इस्रायलने नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे.

३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेची आज होणार भव्य सांगता !

‘‘समारोप सोहळ्याला आज दुपारी २.३० वाजता प्रारंभ होणार आहे. दुपारी ३.४५ वाजता उपराष्ट्रपतींचे मैदानात आगमन होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेतील उत्कृष्ट पुरुष आणि उत्कृष्ट महिला खेळाडू, सर्वाधिक पदके प्राप्त केलेला खेळाडू यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.’’