अहिल्यानगर – ह.भ.प. इंंदुरीकर महाराज यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये शिर्डी येथील ओझरमधील कीर्तनात ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते’, असे ते विधान होते. त्यांच्यावर ‘गर्भलिंग निदान निवडी’चे विज्ञापन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकार यांनी या सुटकेविषयी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली होती; मात्र उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयामध्ये ही तक्रार प्रविष्ट करावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर अंनिस आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले; परंतु तेथेही उच्च न्यायालयाचा आदेश मान्य केला गेला. त्यामुळे ह.भ.प. इंंदुरीकर महाराज यांच्यावर संगमनेर न्यायालयामध्ये नव्याने खटला चालू झाला आहे.