औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांना पक्षात प्रवेश दिल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक !

कादिर मौलाना याने औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला असून राज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही, अशी चेतावणी हिंदु राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय अडोळे यांनी दिली आहे

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारची अनुमती !

या निधीतून गड-दुर्ग पर्यटन आणि तीर्थस्थळे, सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक,शिवसृष्टी, वढु बुद्रुक येथील स्मारका, अष्टविनायक, श्री क्षेत्र जेजुरी यांचा विकास होणार असून वनपर्यटनाला चालना देण्यासाठी बिबटे सफारी चालू करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट यांच्या सर्व आमदारांना विधानसभेच्या अध्यक्षांची नोटीस !

दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार ही नोटीस अध्यक्षांनी पाठवली आहे.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात गड अतिक्रमणमुक्त ?

गड-दुर्गांच्या संवर्धनाची घोषणा राज्य सरकारने केली आहे; मात्र त्यांचा इतिहास भावी पिढीपुढे आणण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी एकत्रित प्रयत्न करणे अपेक्षित आहे. गड-दुर्गांचे संवर्धन हा केवळ राजकीय लाभापुरता विषय मर्यादित न ठेवता त्याविषयी आत्मियतेने काम करणे आवश्यक आहे.

मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !

बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घेतलेले अभ्यासवर्ग

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९८६ पासून ‘अध्यात्म’ या विषयावर ठिकठिकाणी जाऊन अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९२ मध्ये घेतलेल्या अभ्यासवर्गांत जिज्ञासूंनी विचारलेले विविध प्रश्न आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली त्यांची उत्तरे अंतर्भूत आहेत.

हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !

जगभरात ज्या ज्या देशांत साम्यवाद्यांनी सत्ता बळकावली, ती रक्तरंजित क्रांती करूनच बळकावली आहे. भारतातही नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करून पाहिला; मात्र त्याला मर्यादा असल्याने त्यांनी आता कूटनीतीचा वापर चालू केला आहे. या आक्रमकांनी आता एकत्र येऊन मानसिक आणि बौद्धिक स्तरावरील युद्धनीतीचा वापर चालू केला आहे…

राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !

३ जुलै २०२३ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने देशभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांची वर्ष २०२२ आणि २०२३ मधील मांडणी, तसेच देवघराच्या प्रत्येक खणातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होणे अन् त्याचे प्रमाण निरनिराळे असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !