शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना धमकी देणार्‍याला अटक

राज्‍याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना खंडणीसाठी जिवे मारण्‍याची वारंवार धमकी देणार्‍या प्रदीप भालेकर या संशयितावर मलबारहिल पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करून अटक करण्‍यात आली आहे. 

पुणे महापालिकेची आरोग्‍य सेवा ठरत आहे कुचकामी !

शहरात महापालिकेच्‍या २२ रुग्‍णालयांमध्‍ये रुग्‍णांना उपचारांसाठी भरती करून घेण्‍याची सुविधा आहे. येथील बेडची क्षमता अनुमाने १ सहस्र ३७६ असली, तरी त्‍यातील केवळ ५७७ खाटा कार्यान्‍वित आहेत. पुणेकरांना चांगल्‍या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्‍यासाठी पालिका प्रतिवर्षी ५०० कोटी रुपयांहून अधिक व्‍यय करत असली, तरी सर्वसामान्‍यांपासून ही आरोग्‍यसेवा दुरावल्‍याचे  चित्र आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशा मागणीचे केंद्रीय विधी आणि न्‍याय मंत्री यांच्‍या नावे असलेले निवेदन गडहिंग्‍लज येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नायब तहसीलदार विष्‍णु बुट्टे यांना दिले. 

महाराष्‍ट्र विधान परिषदेचा शतकोत्तर महोत्‍सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार !

‘महाराष्‍ट्र विधान परिषदेचा शतकोत्तर महोत्‍सव’ संस्‍मरणीय ठरेल, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात यावे, अशी सूचना विधान परिषदेच्‍या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केली. 

पुणे येथे पोलीस ठाण्‍यातच पोलीस निरीक्षक यांच्‍याशी अरेरावी आणि धक्‍काबुक्‍की !

पोलीस ठाण्‍यातच पोलिसांना धक्‍काबुक्‍की होणे म्‍हणजे पोलिसांचा वचक नसल्‍याचे द्योतक. असे पोलीस कायदा आणि सुव्‍यवस्‍था कशी राखणार ? अशा पोलिसांचा जनतेला कधी आधार वाटेल का ?

गरीब रुग्‍णांना सेवा नाकारणार्‍या धर्मादाय रुग्‍णालयांवर कारवाई करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

गरीब रुग्‍णांना रुग्‍णसेवेची अट घालून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी रुग्‍णालयांसाठी महानगरपालिकेने जागा दिली; मात्र खासगी रुग्‍णालयांकडून त्‍याचे उल्लंघन होत असून पालिका रुग्‍णालये सुविधा पुरवण्‍यात अपुरी पडत आहेत.

कोल्‍हापूर येथील मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन आणि अन्‍य प्रश्न सांघिकपणे सोडवणार ! – मंदिर विश्वस्‍त, पुजारी यांच्‍या बैठकीत निर्धार

शाहूपुरी येथील राधाकृष्‍ण मंदिर येथे मंदिरांच्‍या विविध प्रश्नांसाठी, तसेच व्‍यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या पुढाकाराने एक बैठक घेण्‍यात आली. त्‍या बैठकीत हा निर्धार करण्‍यात आला. या बैठकीसाठी २१ मंदिरांचे ३० विश्‍वस्‍त, पुजारी, पदाधिकारी उपस्‍थित होते.

जिल्‍हा परिषदेच्‍या अखत्‍यारीतील ८० शाळा शिक्षकांविना !

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची स्‍थिती अशी का ? शाळेमध्‍ये शिक्षकच नाहीत, ही स्‍थिती गंभीर आहे. अशा स्‍थितीमुळेच जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा बंद पडत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यावर त्‍वरित उपाययोजना काढणे आवश्‍यक !

गोवा : कला अकादमीतील रंगमंचाचे छत कोसळल्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ !

कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळल्याच्या प्रकरणाचे पडसाद गोवा विधानसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर उमटले !

प्रेमास नकार दिल्‍याने अल्‍पवयीन मुलीला जिवे मारण्‍याची धमकी देणार्‍या धर्मांधाला पुणे येथे अटक !

वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्‍या ! त्‍यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच अशा संकटाला सामोरे जाण्‍यासाठी आता मुलींनीही स्‍वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे.