धर्मांतरविरोधी आणि गोहत्याबंदी कायदे रहित केल्यास रस्त्यावर उतरू !

पत्रकार परिषदेत साधू-संतांनी सांगितले की, सरकारकडून या संदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले, तर ते हिंदूंच्या भावनांच्या विरोधात समजले जाईल आणि यामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल.

पुणे येथील चांदणी चौकातील पुलाच्या कामामुळे ३ घंटे वाहतूक बंद !

चांदणी चौकातील पुलाच्या ‘गर्डर’ (संरक्षक भिंत) उभारणीचे काम चालू होणार आहे. त्यामुळे पुणे-सातारा महामार्गांवरील पुणे येथील ‘चांदणी चौक’ मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रतिदिन मध्यरात्री १२ ते ३.३० पर्यंत बंद राहील.

नंदुरबार येथे वादळाने जिल्हा परिषदेच्या ४४ शाळांची हानी !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांवर कारवाई करायला हवी !

मसगा महाविद्यालयात इस्लामचा प्रचार केल्याप्रकरणी प्रा. अनिस कुट्टींसह ३ आरोपी !

अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

जळगावच्या वसतीगृहाच्या महिला गृहपाल सुट्टीवर गेल्याने पुरुष शिपायाकडे दायित्व !

महिला वसतीगृहात पुरुष कर्मचार्‍यांना बंदीचा आदेश असतांनाही त्याकडे कानाडोळा करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

लोणावळा येथील भुशी धरण दुथडी भरून वाहू लागले !

शहरात २४ घंट्यात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तसेच येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ३० जूनला रात्री १० वाजता ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. मागील काही दिवसांपासून सलग पडणार्‍या पावसामुळे येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत.

भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.

बकरे आणणार्‍या मुसलमान कुटुंबातील महिलेकडून हिंदूंवर विनयभंगाची तक्रार !

मीरारोड येथे सोसायटीमध्ये ईदनिमित्त कुर्बानीसाठी बकरे आणल्याचे प्रकरण !

केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापत आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नकोत. केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला…