राज्‍यभर पाऊस चालूच !

राज्‍यात पश्‍चिम महाराष्‍ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्‍ट्र आणि मराठवाडा आदी सर्वच ठिकाणी २ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. राज्‍यात सर्वच ठिकाणच्‍या नदी-नाल्‍यांना पूर आला असून त्‍यांच्‍या आसपासचे अनेक मार्ग बंद पडल्‍याने अनेक खेडेगावांचा संपर्क तुटला आहे.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्‍या बाहेर !

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात चालू असलेल्‍या संततधार पावसाने कोल्‍हापूर शहरात १९ जुलैला पंचगंगा नदी रात्री ११.१५ वाजता नदीच्‍या पात्राच्‍या बाहेर पडली. सध्‍या नदीच्‍या पाण्‍याची पातळी ३२ फूट असून केवळ एका दिवसात १० फूट पाणी वाढले आहे.

गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजींचे कार्य अतुलनीय ! – ह.भ.प. लक्ष्मीकांतजी महाराज पाथरीकर

परमपूज्‍य गुरुदेव डॉ. काटेस्‍वामीजी यांनी सनातन वैदिक हिंदु धर्मासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्‍यांनी लिहिलेले वाड्‌मय हे धर्मरक्षण आणि धर्म संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन भागवतोत्तम ह.भ.प. लक्ष्मीकांतजी महाराज पाथरीकर यांनी केले.

खापरखेडा औष्‍णिक वीज केंद्र (नागपूर) येथील राखेचा बंधारा फुटल्‍याने शेतात चिखल !

बंधार्‍यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकर्‍यांच्‍या शेतात पसरला आहे. त्‍यामुळे नुकतीच पेरणी केलेल्‍या शेतकर्‍यांचीही पुष्‍कळ आर्थिक हानी झाली आहे. 

बहिष्‍कार आणि जागृती यांद्वारे हलाल प्रमाणपत्राला विरोध करता येईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भिलवाडा (राजस्‍थान) ‘श्री नगर माहेश्‍वरी सभे’च्‍या कार्यकारिणीच्‍या बैठकीत हलाल प्रमाणपत्राविषयी प्रबोधन !

ईडीकडून भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्याला अटक !

कोविड केंद्र गैरव्‍यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लाईफ लाईन मॅनेजमेंट आस्‍थापनाचे भागीदार सुजित पाटकर यांच्‍यासह एका आधुनिक वैद्य किशोर बिसुरे यांना अटक केली.

‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी घालून येणार्‍या विद्यार्थ्‍यास महाविद्यालयाकडून दमदाटी !

गळ्‍यात भगवी पट्टी घालणार्‍यांना महाविद्यालय प्रशासन दमदाटी करत असेल, तर अशा प्रशासनाला पालकांनीही वैध मार्गाने जाब विचारणे आवश्‍यक !

परदेशी शिक्षणासाठीच्‍या शिष्‍यवृत्तीच्‍या विद्यार्थी संख्‍येतील वाढीचा निर्णय घेऊ ! – शंभूराज देसाई, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क मंत्री

विधानपरिषदेमध्‍ये काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी अनुसूचित जाती-जमातीच्‍या विद्यार्थ्‍यांना परदेशी शिक्षण शिष्‍यवृत्ती संदर्भात विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

शासकीय पशू-मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापिठाच्‍या कार्यकारिणीत गोसेवा आयोगाच्‍या प्रतिनिधीची नियुक्‍ती होणार !

२० जुलै या दिवशी महाराष्‍ट्र पशू आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्‍ये सुधारणा करून शासनाने ही नियुक्‍ती घोषित केली.

कोपरगावात अवैध कार्य करणार्‍या मदरशावर बुलडोजर चालवावा लागेल ! – सुरेश चव्‍हाणके, संपादक, सुदर्शन वाहिनी

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात कोपरगाव (अहिल्‍यानगर) येथे जनआक्रोश मोर्चा