आनंदी, स्थिर, तसेच प्रेमभाव हा स्थायीभाव असणार्‍या पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

आनंदी, स्थिर आणि प्रेमभाव हा स्थायीभाव असणारे येथील पू. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) हे सनातनच्या १२५ व्या संतपदी ६ जुलै या दिवशी विराजमान झाले.

आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न !

गतवर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत हे उत्पन्न ५७ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

पुणे येथे पोलिसांकडून कोयता गँग टोळीची महाविद्यालयात धिंड !

कोयता गँग सिद्धच व्हायला नको, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

हत्यारांसह छायाचित्र प्रसारित करणार्‍या धर्मांध महिलेवर गुन्हा नोंद !

कोयता, चाकू, छर्‍याची बंदूक, हॉकी स्टिकसमवेत ‘व्हिडिओ’ सिद्ध करून सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित करणार्‍या आयेशा परवीन सरवर (वय ४६ वर्षे) या महिलेवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

‘ना टायर्ड हूँँ, ना रिटायर्ड हूँ ।’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला निवृत्त व्हायला सांगत आहेत, त्यावर काय सांगाल?’, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्या वेळी त्यांनी वरील विधान केले.

एका जिल्ह्यातील २ शहरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी पोलिसांकडून चौकशी !

गेली अनेक वर्षे जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येत आहे; मात्र या वेळी पोलिसांकडून प्रथमच एवढे प्रश्न विचारण्यात आल्याचे साधकांनी सांगितले. 

मीरा रोड येथील ‘टिपू सुलतान चौका’चा नामफलक हटवा !

मीरा रोड येथील नयानगर भागातील एका चौकाचे वर्ष २०१६ मध्ये ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. ‘टिपू सुलतान’ हे नाव पालटण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आली आहे.

प्रदीप कुरुलकर यांनी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते पाकिस्तानला दिल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात निष्पन्न !

कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.त विकसित केलेल्या ‘कंपोझिट हल’, ‘ब्रह्मोस लाँचर’, ड्रोन, यू.सी.बी. ‘अग्नी मिसाईल लाँचर’, ‘मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम’ आणि ‘मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट’ सिद्ध करणे, विकसित करणे, ‘डिझाइन’ करण्याचे काम आणि इतर सुरक्षेसंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या  पाकच्या महिलेला दिली.

मूर्तीकारांना नि:शुल्क जागा आणि घरगुती स्तरावर शाडूच्या मूर्तीचे बंधन !

मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी !