मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे ४० आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १४ यांना नोटीस पाठवली आहे. या सर्वांना येत्या ७ दिवसांत स्वत:च्या पात्रतेविषयीची भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे पुराव्यासह विधीमंडळाकडे सादर करण्याचा आदेश दिला आहे. या दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याविषयी अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते, तसेच याविषयी सर्वाेच्च न्यायालयातही दोन्ही पक्षांकडून याचिका करण्यात आली होती.
याविषयीचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यावा, असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही नोटीस पाठवली आहे.