भारतियांचे नैतिक अधःपतन रोखण्‍यासाठी धर्मशिक्षण द्या !

केंद्रशासनाकडून राष्‍ट्रीय कुटुंब आरोग्‍य सर्वेक्षणात ५६ टक्‍के तरुणींनी मान्‍य केले की, त्‍या घराबाहेर असल्‍यावर शारीरिक संबंध ठेवतात, तर ३२ टक्‍के पुरुष घराबाहेर असतांना संबंध ठेवण्‍यास प्राधान्‍य देतात.

सीमा हैदर ही भारत-नेपाळ मैत्री बस सेवेचा अपलाभ घेऊन चतुराईने आली भारतात !

नेपाळच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याचा दावा

अंकलगे (अक्‍कलकोट) येथे वानराच्‍या मृत्‍यूनंतर मिरवणूक काढून अंत्‍यविधी !

अक्‍कलकोट तालुक्‍यातील अंकलगे येथे २२ जुलै या दिवशी एका वानराचा मृत्‍यू झाला. ग्रामस्‍थांनी मिरवणूक काढून वानराचा अंत्‍यविधी केला, तसेच वानराला ज्‍या ठिकाणी पुरण्‍यात आले त्‍या जागेत हनुमान मंदिर बांधणार असल्‍याची माहिती सरपंच मारुति कोळी यांनी दिली.

सोलापूर येथील ‘पर्यावरण दूत’ डॉ. मनोज देवकर यांचा होणार सन्‍मान !

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा राष्‍ट्रीय सेवा योजना विभाग आणि पुणे येथील ‘हरित मित्र परिवार लोक विद्यापीठ’ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरणदिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रदान करण्‍यात येणारा ‘पर्यावरण दूत’ पुरस्‍कार येथील वनस्‍पतीशास्‍त्र पदवी प्राप्‍त डॉ. मनोज देवकर यांना देण्‍यात येणार आहे.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात पूरस्‍थिती निर्माण होण्‍याची शक्‍यता : प्रशासनाच्‍या सतर्कतेच्‍या सूचना !

जिल्‍ह्यात सातत्‍याने होत असलेल्‍या पावसामुळे जिल्‍ह्यातील स्‍थिती गंभीर होत आहे. कोल्‍हापूर-गगनगिरी, तसेच कोल्‍हापूर-आंबोली मार्ग बंद असल्‍याने कोकणात जाण्‍यासाठीचा मार्ग बंद झाला आहे. पंचगंगा नदी आता इशारा पातळीच्‍या (३९ फूट) जवळ पोचत आली असून आज पंचगंगा नदीची पातळी ३८ फूट नोंदवली.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे दक्षिणद्वार सोहळा !

कृष्‍णा नदीच्‍या पाण्‍याच्‍या पातळीत वाढ झाल्‍याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे २३ जुलैला दुपारी १ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्‍साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.

पुणे येथे नदीपात्रात राडारोडा टाकल्‍याच्‍या प्रकरणी तिघांवर गुन्‍हा नोंद !

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी त्‍यांच्‍या जवळील २ ‘टेम्‍पो’ आणि १ ‘ट्रॅक्‍टर’ यांच्‍या साहाय्‍याने पिंपळे गुरव येथे पवना नदी पात्रात अनधिकृतपणे राडारोडा टाकला. नदीचे पाणी प्रदूषित करण्‍याची कृती केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

इरशाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्‍या २९

येथील ४८ पैकी १७ घरे गाडली गेली आहेत. पावसामुळे दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असल्‍याने इतरांना इरशाळवाडीत येण्‍यास बंदी करण्‍यात आली असून येथे कलम १४४ लागू करण्‍यात आले आहे.

संस्‍कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्‍हा भगवंत अवतार घेतातच ! – प.पू. माताजी स्‍थितप्रज्ञानंद सरस्‍वती

संस्‍कृती आणि धर्म यांवर आघात होतात, तेव्‍हा संस्‍कृती अन् धर्म यांच्‍या रक्षणार्थ भगवंत अवतार घेतात. हेच श्रीकृष्‍ण आणि श्रीराम यांनी आपल्‍या अवतार कार्यामधून दाखवून दिले, असे मार्गदर्शन प.पू. माताजी स्‍थितप्रज्ञानंद सरस्‍वती यांनी केले.

आर्.डी.एक्‍स.ने भरलेला टँकर गोव्‍याला जात असल्‍याचा मुंबई पोलिसांना भ्रमणभाष

पोलिसांना पांडे नावाच्‍या व्‍यक्‍तीने भ्रमणभाष करून सांगितले की, आर्.डी.एक्‍स.ने भरलेला पांढरा टँकर मुंबईहून गोव्‍याला जात आहे. त्‍यात २ पाकिस्‍तानी आतंकवादी आहेत.