पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांतील १४४ गावे दरडप्रवण भागात, तर ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे स्पष्ट !
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ४ जिल्ह्यांमधील १४४ गावे दरडप्रवण भागात असून ५ जिल्ह्यांत ५९४ पूरप्रवण क्षेत्रे असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.