महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने रत्नागिरीतूनही एकाला घेतले कह्यात

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएसने) येथील एका व्यक्तीला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्यावरून त्याची चौकशी चालू करण्यात आली आहे. याआधी पुण्यातून २ आतंकवाद्यांना कह्यात घेण्यात आले होते.

कारवाई टाळण्‍यासाठी लाच मागणार्‍या मंडलाधिकार्‍यावर गुन्‍हा नोंद !

गौण खनिज कायद्याच्‍या अंतर्गत कारवाई टाळण्‍यासाठी कोरेगाव तालुक्‍यातील पिंपोडे बुद्रुक येथील महसूल मंडलाधिकारी संजय बोबडे यांनी ५० सहस्र रुपयांची लाच मागितली.

सीरियातील सर्वांत प्रसिद्ध शिया धार्मिक स्‍थळाजवळ झालेल्‍या बाँबस्‍फोटात ६ जण ठार !

राजधानी दमास्‍कसच्‍या ग्रामीण भागात ‘असयदा जैनब’ या महंमद पैगंबर यांच्‍या नातीचे थडगे असून शिया मुसलमानांमध्‍ये हे सर्वांत प्रसिद्ध धार्मिक स्‍थळ आहे. याला लक्ष्य करून हा स्‍फोट करण्‍यात आला.

मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील धरणाच्या भिंतीला गळती : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तालुक्यातील भोळवली येथील धरणाच्या भिंतीला गळती लागल्याने दापोलीच्या पाटबंधारे विभागाने २६ जुलैला ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर धरणात साठलेल्या पाण्याचा विसर्ग चालू केला आहे; मात्र ग्रामस्थांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण कायम आहे.

भाजपचे खासदार सुनीलकुमार सिंह लोकसभेत समान नागरी कायद्यासाठी प्रस्‍ताव मांडणार

मनमानीपणा आणि सरकारी सुविधा बंद होण्‍याच्‍या भीतीने अल्‍पसंख्‍यांकांकडून समान नागरी कायद्याला विरोध होतो, हे जाणा !

कलम ३७० हटवण्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

जम्‍मू-काश्‍मीरला विशेष राज्‍याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्‍याच्‍या समर्थनार्थ काश्‍मिरी हिंदूंनी सर्वोच्‍च न्‍यायालयात २ याचिका प्रविष्‍ट केल्‍या आहेत.

नागालँडमधील सरकारी शस्‍त्रागारातून शस्‍त्रास्‍त्रांची चोरी : पोलीस निरीक्षकासह ६ जणांना अटक !

अशा पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करून त्‍यांना आजन्‍म कारागृहात धाडले पाहिजे !

पावसाळ्‍यातील सांधेदुखीवर सोपा उपचार

सततच्‍या पावसामुळे वातावरणात थंडी वाढू लागल्‍यावर अनेकांना हातापायांचे सांधे दुखण्‍याचा त्रास चालू होतो. असे सांधे दुखत असल्‍यास हिटिंग पॅडच्‍या साहाय्‍याने हातपाय शेकावेत. याने दुखण्‍यापासून लगेच आराम मिळतो. शेकण्‍यासाठी गरम पाणी, शेकोटी किंवा केस वाळवण्‍याचे यंत्र (हेअर ड्रायर) यांचाही वापर करता येतो. कोणत्‍याही पद्धतीने दुखणारा भाग शेकणे महत्त्वाचे आहे.’

कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कलमामध्ये ३ मासांत सुधारणा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सरकारी कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कायद्याचा वापर कर्मचार्‍यांकडून शस्त्र म्हणून केला जात आहे. सामान्य माणसांची पिळवणूक केली जात असून हे कलम त्वरित रहित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.