साधकांची साधना होण्यासाठी अपार कष्ट घेणारे, साधकांना आपला अमूल्य सहवास देऊन आणि वेळोवेळी आधार देऊन त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

‘वर्ष १९८४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे माझ्या जीवनात येऊन त्यांनी मला प्रत्यक्ष सहवास दिला. त्यांनी मला पुनःपुन्हा साधना सांगून माझ्याकडून ती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मला विविध संधी उपलब्ध करून दिल्या.

भक्तीयोगाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि अन्य योगमार्गियांच्या तुलनेत भक्तीमार्गाने साधना केल्यामुळे संतपद प्राप्त करणार्‍यांची संख्या अधिक असण्यामागील कारणे !

विविध योगमार्गांनुसार साधना करण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि त्यांच्यामुळे विकसित होणारे गुण पुढीलप्रमाणे आहेत. ४ जुलै २०२३ या दिवशी या योगमार्गांविषयीचा काही भाग पाहिला.

अखंड नामजप, तसेच चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्रीमती वैशाली मुंगळे (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !

श्रीरामाचा अखंड नामजप करून त्याद्वारे इतरांना नामजपाची गोडी लावणार्‍या आणि चिकाटीने व्यष्टी अन् समष्टी साधना करणार्‍या ईश्वरपूर येथील श्रीमती मुंगळेआजी यांना ७ जुलै या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले.

आनंदी, स्थिर, तसेच प्रेमभाव हा स्थायीभाव असणार्‍या पू. अरविंद सहस्रबुद्धे यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

आनंदी, स्थिर आणि प्रेमभाव हा स्थायीभाव असणारे येथील पू. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७६ वर्षे) हे सनातनच्या १२५ व्या संतपदी ६ जुलै या दिवशी विराजमान झाले.

आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ६ कोटी २७ लाख रुपयांचे उत्पन्न !

गतवर्षीच्या माघी यात्रेच्या तुलनेत हे उत्पन्न ५७ लाख रुपयांनी अधिक आहे, अशी माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

पुणे येथे पोलिसांकडून कोयता गँग टोळीची महाविद्यालयात धिंड !

कोयता गँग सिद्धच व्हायला नको, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

हत्यारांसह छायाचित्र प्रसारित करणार्‍या धर्मांध महिलेवर गुन्हा नोंद !

कोयता, चाकू, छर्‍याची बंदूक, हॉकी स्टिकसमवेत ‘व्हिडिओ’ सिद्ध करून सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित करणार्‍या आयेशा परवीन सरवर (वय ४६ वर्षे) या महिलेवर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

‘ना टायर्ड हूँँ, ना रिटायर्ड हूँ ।’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्हाला निवृत्त व्हायला सांगत आहेत, त्यावर काय सांगाल?’, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्या वेळी त्यांनी वरील विधान केले.

एका जिल्ह्यातील २ शहरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी पोलिसांकडून चौकशी !

गेली अनेक वर्षे जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येत आहे; मात्र या वेळी पोलिसांकडून प्रथमच एवढे प्रश्न विचारण्यात आल्याचे साधकांनी सांगितले. 

मीरा रोड येथील ‘टिपू सुलतान चौका’चा नामफलक हटवा !

मीरा रोड येथील नयानगर भागातील एका चौकाचे वर्ष २०१६ मध्ये ‘हजरत टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. ‘टिपू सुलतान’ हे नाव पालटण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आली आहे.