राज्‍यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरित करणार !

इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्‍य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्‍न सभागृहात उपस्‍थित केला.

पंचगंगा नदीच्‍या पाण्‍याची वाटचाल धोक्‍याच्‍या पातळीजवळ : आंबोलीसह अनेक वाहतूक मार्ग बंद !

गेले ४ दिवस चालू असलेल्‍या पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी आता धोक्‍याच्‍या पातळी म्‍हणजे ३९ फुटांकडे वाटचाल करत आहे. २१ जुलैला नदीची पाणीपातळी ३५ फूट ४ इंच नोंदवली गेली.

प्रसिद्ध बांधकाम व्‍यावसायिक डी.एस्.के. यांच्‍या ३३५ मालमत्ता शासनाधीन !

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिक डी.एस्.के. यांच्‍या आतापर्यंत ३३५ स्‍थावर मालमत्ता शासनाधीन केल्‍या आहेत.

इगतपुरी येथे कावनई गडाचा भाग कोसळला !

कावनई गडाचा भाग कोसळला आहे. गडाच्‍या पायथ्‍याखाली ५ ते ६ घरे असल्‍याचे समजते; पण या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

राजकीय भांडवलासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालू नये ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

‘देहली येथे निर्भया हत्‍या प्रकरण घडले, त्‍या वेळी कुणाचे राज्‍य होते ?, हे आपण पाहिले नव्‍हते. कुर्ला येथे असेच प्रकरण घडले, तेव्‍हा मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, तेव्‍हा आपण ‘शक्‍ती’ कायदा केला, असे सांगून या प्रकरणी ‘विरोधकांनी राजकारण करू नये’, असे नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

राजू यादव यांच्‍याकडून उंचगाव परिसरातील १०० ज्‍येष्‍ठ आणि गरजू नागरिकांना छत्री वाटप !

सातत्‍याने सामाजिक उपक्रम घेणारे ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्‍या पुढाकाराने उंचगाव परिसरातील १०० ज्‍येष्‍ठ नागरिक आणि गरजू यांना छत्री वाटप करण्‍यात आले. पावसाळ्‍यात देण्‍यात आलेल्‍या या छत्र्यांविषयी नागरिकांनी समाधान व्‍यक्‍त केले.

हिंदु प्रवाशांना हलाल चहा देणारे ‘धर्मनिरपेक्ष’ रेल्‍वे प्रशासन ! 

रेल्‍वेमध्‍ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्‍याचा संतापजनक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांत प्रसारित झाला आहे. रेल्‍वे अधिकार्‍याला यासंदर्भात जाब विचारल्‍यावर ‘चहा शाकाहारी आहे’, असे त्‍याने सांगितले.

कल्‍याण येथे खड्डे चुकवतांना दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू !

आणखी किती जणांचे मृत्‍यू झाल्‍यावर प्रशासन आणि सरकार ‘खड्डेमुक्‍त महाराष्‍ट्र’ करणार आहे ?

विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून शाळेच्‍या बसचालकांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावे ! – पोलीस आयुक्‍त रितेश कुमार

शालेय विद्यार्थ्‍यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून विद्यार्थ्‍यांची वाहतूक करणार्‍या बसचालकांनी बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे पोलीस आयुक्‍त रितेश कुमार यांनी सांगितले.