मुंबईत मॅनहोल्‍सवरील चोर्‍यांची स्‍थिती गंभीर, प्रतिवर्षी ६३२ मॅनहोल्‍सच्‍या झाकणांची होते चोरी !

मुंबईमध्‍ये प्रत्‍येक मासाला सरासरी ५२ मॅनहोल्‍सवरील झाकणांची चोरी होते. मागील ४ वर्षांत मुंबईतून एकूण २ सहस्र ५३१ मॅनहोल्‍सची लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत, अशी लेखी माहिती राज्‍यशासनाकडून विधानसभेतील एका तारांकित प्रश्‍नांवर लिखीत स्‍वरूपात दिली आहे.

‘लव्‍ह जिहाद’द्वारे होणारे धर्मांतर पुष्‍कळ अधिक प्रमाणात घातक ! – सुदीप्‍तो सेन, ‘द केरल स्‍टोरी’चे दिग्‍दर्शक

देशातील काही राज्‍यांमध्‍ये असलेला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ हा बळजोरीने केलेल्‍या धर्मांतराच्‍या विरोधात आहे; मात्र ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये प्रेमाच्‍या नावाने बुद्धीभेद करून मुलींना इस्‍लाम धर्म स्‍वीकारण्‍यास भाग पाडून त्‍यांना आखाती देशांत पाठवून त्‍यांचे शोषण केले जाते.

‘जलजीवन मिशन योजने’चा बट्ट्याबोळ करणार्‍यांची चौकशी करा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्‍या हेतूने चालू केलेल्‍या ‘जलजीवन मिशन योजना’ राबवतांना चुकीच्‍या पद्धतीने करण्‍यात आलेले सर्वेक्षण, निधी असूनही अर्धवट कामे चालू न होणे आणि चालू झालेली कामे अर्धवट ठेवल्‍याने एका चांगल्‍या योजनेचा बट्ट्याबोळ करण्‍यात आला आहे.

राज्‍यातील माध्‍यान्‍ह भोजन योजनेच्‍या घोटाळ्‍यांच्‍या आरोपांचे कामगार आयुक्‍तांकडून अन्‍वेषण होणार ! – डॉ. सुरेश खाडे, कामगारमंत्री

जिल्‍हा स्‍तरावर कामगारांना जी घरे दिली जातात किंवा इतर योजनेच्‍या अंतर्गत सोयी पुरवल्‍या जातात, त्‍यासाठी जिल्‍हाधिकार्‍यांची समिती नेमली जाईल आणि त्‍याची कार्यवाही व्‍यवस्‍थित होत आहे का ? याकडे ही समिती लक्ष ठेवणार आहे.

‘लँड जिहाद’द्वारे भूमी हडप करणारा वक्‍फ कायदा रहित करा ! 

वक्‍फ कायद्याद्वारे वक्‍फ बोर्डाला मुसलमानांचीच नव्‍हे, तर अन्‍य धर्मियांची धार्मिक संपत्ती बळकावण्‍याचा अधिकार आहे, हे पुन्‍हा एकदा सिद्ध झाले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्‍य समाजातील विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासाठी कोल्‍हापूर येथे स्‍थापन केलेल्‍या ‘द मोहामेडन एज्‍युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्‍याची प्रक्रिया वक्‍फ बोर्डाने चालू केली आहे.

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍यास कोणतीही बंदी नाही; मात्र प्रदूषण टाळण्‍यासाठी कृत्रिम तलावांची संख्‍या वाढवणार !

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या श्री गणेशमूर्ती बनवण्‍यास शासनाने कोणतीही बंदी केलेली नाही; मात्र या मूर्तींमुळे कोणत्‍याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये; म्‍हणून कृत्रिम तलावांची संख्‍या वाढवण्‍यात येईल. राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांना तशा सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

शिरीष कणेकर काळाच्‍या पडद्याआड !

ज्‍येष्‍ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे वयाच्‍या ८० व्‍या वर्षी निधन झाले आहे. खास शैलीतून टोकदार, तसेच उपाहासात्‍मक लिखाण करणारे शिरीष कणेकर यांचे अनेक चाहते आहेत.

पुण्‍यात ५ सहस्र बांगलादेशी नागरिकांचे वास्‍तव्‍य; केवळ ५ जणच मायदेशी परतले !

एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर वाढेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत होते का ?
यास उत्तरदायी असलेल्‍या पोलिसांना आजन्‍म कारागृहात टाका !

तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन न होण्यामागील अडचणी दूर करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणखी एक दरड कोसळली !

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्‍याजवळ २४ जुलैला सकाळी ६ वाजता आणखी एक दरड कोसळली होती. ही दरड लहान होती. प्रशासनाकडून तातडीने मार्गावरील ही दरड हटवण्‍यात आली.