आतंकवादविरोधी पथकाच्‍या आरोपपत्रात डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांवर ठपका

संरक्षण संशोधन आणि विकास संस्‍थेचे (डी.आर्.डी.ओ.चे) संचालक आणि वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी ‘ब्रह्मोस’सह ‘अग्‍नी’ आणि ‘रुस्‍तुम’ या क्षेपणास्‍त्रांची माहिती पाकिस्‍तानच्‍या महिला गुप्‍तहेराला दिली होती

यावर्षी भारतातील ४ सहस्र महिलांनी पुरुषांविना हज यात्रा केली ! – पंतप्रधान मोदी

यंदाच्‍या वर्षी प्रथमच देशातून ५० किंवा १०० नव्‍हे, तर ४ सहस्र मुसलमान महिला एकट्याच, म्‍हणजे पुरुषांविना हज यात्रा करून आल्‍या, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात दिली.

सातारा जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयातील २ न्‍यायाधिशांचे स्‍थानांतर !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाने सातारा येथील न्‍यायालयातील जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश मंगला धोटे अन् तिसरे जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश स.र. सालकुटे या २ न्‍यायाधिशांचे स्‍थानांतर करण्‍यात आले.

प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते ठाणे येथील कर्करोग रुग्‍णालयाचा पायाभरणी सोहळा !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पांपैकी एक असलेला येथील कर्करोग रुग्‍णालयाचा पायाभरणी सोहळा प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्‍या हस्‍ते भूमीपूजन करून पार पडला.

मणीपूर हिंसाचारावरून सरन्‍यायाधिशांवर टीका करणार्‍या लेखकाला तमिळनाडू पोलिसांकडून अटक !

पोलिसांनी राजकीय विश्‍लेषक आणि लेखक बद्री शेषाद्री यांना ‘यू ट्युब’ वाहिनीवरील एका मुलाखतीमध्‍ये मणीपूरमधील हिंसाचारावरून  सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांच्‍यावर टीका केल्‍याच्‍या आरोपावरून अटक केली.

राज्‍यातील सर्व नागरिकांनी ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करावी ! – सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे आवाहन

‘आयुष्‍मान भारत डिजिटल मिशन’चा भाग म्‍हणून भारत सरकारने ‘डिजिटल हेल्‍थ कार्ड’ हा उपक्रम चालू केला आहे. राज्‍यातील सर्व नागरिकांसाठी हेल्‍थ कार्ड आवश्‍यक आहे. त्‍यामुळे सर्व नागरिकांनी ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्‍य विभागाने केले आहे.

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तीपदी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांची नियुक्‍ती !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तीपदी २९ जुलै या दिवशी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. राजभवन येथे राज्‍यपाल रमेश बैस यांनी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांना न्‍यायमूर्तीपदाची शपथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दौर्‍यासाठी ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्‍ट या दिवशी पुण्‍यात येणार असल्‍याने शहरात कडक बंदोबस्‍त ठेवला आहे. पंतप्रधानांच्‍या सुरक्षेचे दायित्‍व असलेले विशेष सुरक्षा पथक (एस्.पी.जी), ‘फोर्स वन’चे सैनिक अशा एकूण ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त आहे.

मिरज येथे ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमात सनातनच्‍या सात्त्विक अत्तराचे वाटप !

अधिक मास अर्थात् पुरुषोत्तम मासानिमित्त ‘ब्राह्मण महिला संघ मिरज’च्‍या वतीने राघवेंद्रस्‍वामी मठात सामूहिक ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी १०० महिला उपस्‍थित होत्‍या. या सर्व महिलांना ब्राह्मण महिला संघाच्‍या वतीने १५० सनातनच्‍या सात्त्विक अत्तराच्‍या बाटल्‍या देण्‍यात आल्‍या.

राहुरी (अहिल्‍यानगर) येथे शाळकरी मुलींसाठी रचले लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्‌यंत्र !

शिकवणीसाठी येणार्‍या इयत्ता सातवी-आठवीतील अल्‍पवयीन मुलींचे धर्मांतर करण्‍याचा, तसेच त्‍यांची मुसलमान तरुणांशी ओळख वाढवण्‍याचा सल्ला हिना मुलींना देत होत्‍या.