(म्हणे) ‘राज्यातील दंगलींमधील निष्पाप आरोपींवरील गुन्हे मागे घ्या !’ – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

‘काँग्रेसचे राज्य म्हणजे दंगलखोर धर्मांधांचे राज्य’ असेच आता म्हणावे लागेल ! सत्तेवर आल्यावर काँग्रेस मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी थेट निर्णय घेते; मात्र हिंदूंच्या बाजूने कोणताही राजकीय पक्ष थेट निर्णय घेत नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव !

कारगिल विजय दिनानिमित्त त्रिशूल युद्ध स्‍मारकासाठी ३ कोटींचा निधी सुपुर्द !

कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्‍मारकाच्‍या दर्जा उन्‍नतीसाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या उपस्‍थितीत ३ कोटी रुपयांचा निधी सुपुर्द करण्‍यात आला.

धरणाला कोणताही धोका नाही ! – कार्यकारी अभियंता गणेश सलगर

या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ द.ल.घ.मी. इतका आहे. वर्ष १९८३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ द.ल.घ.मी. आहे. सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

कल्‍याण येथील मंदिरात चोरी करणारा धर्मांध अटकेत !

कठोर शिक्षा होत नसल्‍यामुळेच धर्मांध गुन्‍हे करण्‍याचे धाडस करतात !

२ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारतांना पोलीस हवालदाराला पकडले !

तक्रारदार यांच्‍याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्‍यात एका प्रकरणात अदखलपात्र गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या गुन्‍ह्यात त्‍यांच्‍यावर प्रतिबंधात्‍मक कारवाई होऊ नये, यासाठी तक्रारदार यांनी पवार यांना विनंती केली होती.

राजापूर आणि लांजा तालुक्यांतील ६ दरडप्रवण गावांतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्नशील ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

राजापूर तालुक्यातील ३ आणि लांजा तालुक्यातील ३ अशा दरडप्रवण ६ गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावला जाईल.

खडके (जिल्हा जळगाव) येथील शासकीय वसतीगृहातील अल्पवयीन ५ मुलींच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी ३ जणांना अटक !

पीडित ५ मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आरोपी, त्यांची पत्नी आणि वसतीगृहाच्या अधीक्षक अरुणा पंडित आणि सचिव भिवाजी पाटील यांचाही यामध्ये सहभाग आहे.

फेरफार नोंद करण्‍यासाठी तलाठ्याने मागितली १० सहस्र रुपयांची लाच !

लाच घेणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

सहस्रो शिक्षकांच्‍या दुबार नोंदणीवर कार्यवाही करणार !

राज्‍यामध्‍ये २०२२-२३ पासून सर्व शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांची आधार वैधतेसह माहिती ‘युडायस प्‍लस प्रणाली’मध्‍ये भरण्‍याची कार्यवाही महाराष्‍ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्‍या वतीने चालू आहे.

नागरी वस्तीत आलेली मगर पुन्हा नैसर्गिक अधिवासात केली मुक्त !

खेड तालुक्यातील मौजे कोंडीवली फाटा येथे मानवी वस्तीत आलेल्या ३ फूट लांबीच्या मगरीला वन विभाग वन्यजीव बचाव पथकाने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.