(म्‍हणे) ‘राष्‍ट्रप्रेमी नसलेल्‍यांसमवेत जाणार नाही !’ – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

दंगल घडवून राजकीय लाभ घेण्‍याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्‍ट्रीय ऐक्‍याला तडा देणारे राष्‍ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्‍ट्रप्रेमी नाहीत, त्‍यांच्‍यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बैठकीत घेतली.

उलट तपासणीत अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्‍यास पंच सुभाष वाणी असमर्थ !

कॉ. गोविंद पानसरे हत्‍येच्‍या प्रकरणाची सुनावणी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्‍यासमोर चालू असून ३ आणि ४ जुलै या दिवशी संशयितांच्‍या वतीने ६ अधिवक्‍त्‍यांनी पंच वाणी यांची उलटतपासणी केली.

‘हरित हायड्रोजन’चेे धोरण घोषित करणारे महाराष्‍ट्र देशातील पहिले राज्‍य, मंत्रीमंडळाची मान्‍यता !

४ जुलै या दिवशी झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्‍यात आला आहे.

BREAKING : कुख्यात खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याचा अमेरिकेत अपघातामध्ये मृत्यू झाल्याचा दावा !

दी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित एक दिवसाच्या संगीत कार्यशाळेला बोरी (गोवा) येथील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर आणि त्यांचे विद्यार्थी यांची उपस्थिती !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने एक दिवसाच्या संगीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा लाभ ४५ विद्यार्थ्यांनी घेतला. त्याचा हा वृत्तांत . . .

‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाची शेवटची सिद्धता : अंतराळ यानाला जोडले रॉकेट !

श्रीहरिकोटा येथील ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ येथून ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण होणार असून ५ जुलै या दिवशी अंतराळात सोडणारे रॉकेट ‘एल्.व्ही.एम्. ३’ची त्याला जोडणी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती !

राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ यांसाठी दावा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे. या पत्रावर ३० जून हा दिनांक असून हे पत्र ५ जुलै या दिवशी निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहे.

‘बीबीसी’कडून फ्रान्समधील हिंसाचाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारे वृत्त प्रकाशित !

‘पत्रकारिता एकांगी नसावी’, हे खरे; परंतु त्याचा समतोल राखतांना हिंसाचाराचे समर्थन करणे, हे केव्हाही निषेधार्हच आहे. अर्थात् भारतातील धर्मांध मुसलमानांना नेहमीच पाठीशी घालणार्‍या बीबीसीकडून फ्रान्ससंदर्भात दुसरी कोणती अपेक्षा करणार ?

गोरक्षण : काळाची आवश्यकता !

गोरक्षकांच्या हत्या वारंवार घडत आलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलायला, त्याची नोंद घ्यायलाही कुणी सिद्ध नाही; मात्र तरीही त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तो अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लागलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे !

तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही  ? – अजित पवार

राज्यात शासकीय नोकरीमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षानंतर, तर केंद्रशासनाच्या नोकरीतून ६० वर्षांनी निवृत्त व्हावे लागते. भाजपमध्ये ७५ वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती घ्यावी लागते. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हे नेते याची उदाहरणे आहेत.