… तर शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाऊ शकते ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

कोणता पक्ष ‘शिवसेना’ याविषयी ३१ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निर्णय झाला नाही, तर या निवडणुकींसाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांना प्रतिकात्मक पक्षाचे नाव अन् चिन्ह द्यावे लागेल.

राजूर घाटात (जिल्हा बुलढाणा) महिलेवर सामूहिक बलात्कार 

जिल्ह्यात मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटातून खडकीकडे चाललेल्या एका दांपत्याला ८ जणांच्या टोळक्याने अडवून त्यांच्याकडून ४५ सहस्र रुपये लुटले. तसेच पतीला मारहाण करून ३५ वर्षीय पत्नीवर चाकूचा धाक दाखवून ८ जणांनी बलात्कार केला.

श्री गणेश मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती निर्मितीस प्राधान्य द्यावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा

या वर्षी १९ सप्टेंबर या दिवशीपासून गणेशोत्सव चालू होत आहे. मूर्तीकारांची मूर्ती बनवण्याची लगबग चालू झाली आहे. गणेशोत्सवासाठी केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीची मूर्ती बनवली पाहिजे, अशी सूचना आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करू ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाची सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पहाणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल, तर डिसेंबरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.

३२ दिवसांचा प्रवास करत पालखी सोहळा आळंदीत परतला !

१३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.

शाहूपुरी (सातारा) पोलीस निरीक्षकपदी मुंबई येथील धनंजय फडतरे यांची नियुक्ती !

फडतरे हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले गावचे असून त्यांनी कराड महामार्ग पोलीस विभागात, तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांतील विभागांत सेवा केली आहे.

पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

या वेळी स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी संघटित होऊन लढा द्यायला हवा. अहंकारी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या स्वार्थापोटी हिंदु धर्माची अनन्वित हानी केली आहे. सात्त्विक लोकांना धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी संघर्ष करावा लागतो.’’

‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार देण्यावरून वाद निर्माण !

‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेस, सेवा दल, इंटक या संघटना, तसेच आम आदमी पक्ष आणि युवक क्रांती दलाने विरोध दर्शवला आहे.

अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार !

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी २ जुलै या दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, या सर्व मंत्र्यांची खाती घोषित करण्यात आली. यासह पूर्वीच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पालट करण्यात आला.

‘अनंत प्लास्टिक सर्जरी’च्या वतीने रविवारी स्नेहमेळावा ! – डॉ. मयुरेश देशपांडे, प्लास्टिक सर्जन

संकटग्रस्त रुग्णांना, त्यांचा जीव अथवा त्यांचे तुटलेले हात-पाय-बोटे वाचवण्याच्या दृष्टीने समायोचित मार्गदर्शन करणार्‍या समाजातील देवदूतांचा गौरव करण्यासाठी रविवार, १६ जुलैला सकाळी ११ वाजता ‘रेसिडन्सी क्लब नागाळा पार्क’ येथे स्नेहमेळावा आयोजित केला आहे.