मुंबईतील भिकार्‍याचे मासिक उत्पन्न ७५ सहस्र रुपये !

१ कोटी २० लाख रुपयांची आलिशान सदनिका

मुंबई – मुंबईतील एका भिकार्‍याचे एका मासाचे उत्पन्न ७५ सहस्र रुपये असून त्याच्याकडे १ कोटी २० लाख रुपयांची आलिशान सदनिका, तसेच ठाणे येथे स्वतःच्या मालकीची दोन दुकानेसुद्धा आहेत. या भिकार्‍याचे प्रतिदिनचे उत्पन्न २ सहस्र ५०० रुपये असून तो प्रतिदिन १० ते १२ घंटे भीक मागतो, तसेच एकही दिवस सुट्टी घेत नाही.

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने शिक्षण घेता आले नाही; म्हणून मुंबईतच वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागणे त्याने चालू केले. या भिकार्‍याचे लग्न झाले असून त्याच्या कुटुंबात भावासह वडील आणि स्वतःची दोन मुलेही आहेत.

  संपादकीय भूमिका 

क्षमता असूनही योग्य मार्गाने धन न कमावता अनैतिक मार्गाने पैसे कमावणे म्हणजे एकप्रकारे गुन्हाच आहे !