(म्हणे) ‘भारत सरकार ट्विटरवर बंदी घालणार होते !’ – ट्विटरचे हिंदुद्वेष्टे सहसंस्थापक जॅक डॉर्से

कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी सरकारविरोधी वार्तांकन करणार्‍यांची ट्विटर खाती बंद करण्याचा आदेश दिल्याचा दावा !

माझ्या हिंदु पतीच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून छळ !

मुसलमान युवतीचा गंभीर आरोप – जर या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

कॅनडा सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांच्या हद्दपारीला स्थगिती

यापूर्वीही कॅनडा सरकारने भारतीय विद्यार्थी लवप्रीत सिंह याला १३ जूनपर्यंत देश सोडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे निदर्शने चालू केली होती.

म्हादई प्रकरणी गोवा आणि कर्नाटक राज्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल ! – सी.टी. रवि

गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्याला आव्हान देणारी विशेष याचिका प्रविष्ट केली आहे. या निवाड्यानुसार कर्नाटक वाटप केलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वळवत आहे.

परळी (जिल्‍हा सातारा) येथील प्राचीन महादेव मंदिराच्‍या परिसरात साकारणार बेलाचे वन !

श्रीक्षेत्र सज्‍जनगडच्‍या पायथ्‍याशी असणार्‍या परळी गावातील प्राचीन महादेव मंदिराच्‍या परिसरात ग्रामस्‍थ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्‍या वतीने बेलाचे वन साकारण्‍यात येणार आहे

वणी येथील सप्‍तशृंगी मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू होण्‍याविषयी १५ जूनला विश्‍वस्‍तांची महत्त्वपूर्ण बैठक !

सद्य:स्‍थितीत वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयीचा ठराव वणी ग्रामपंचायतीकडून मंदिर प्रशासनाकडे सुपुर्द करण्‍यात आला आहे. आता मंदिराचे विश्‍वस्‍त काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नाशिक येथे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या विरोधात भाजप महिला मोर्चाच्‍या वतीने तक्रार प्रविष्‍ट !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी भाजप प्रदेश महिला मोर्चाच्‍या अध्‍यक्षा सौ. चित्रा वाघ यांची मानहानी आणि अपर्कीती केल्‍याविषयी फौजदारी गुन्‍हा नोंद करावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चा पदाधिकार्‍यांनी उपनगर पोलीस ठाण्‍यात नुकताच तक्रार अर्ज केला आहे. ‘

निवडणुकांच्‍या तोंडावर महाराष्‍ट्रात दंगली घडवून आणल्‍या जात आहेत का ? हे शोधून कठोर कारवाई करू ! – केशवप्रसाद मौर्य, उपमुख्‍यमंत्री, उत्तरप्रदेश

महाराष्‍ट्रात निवडणुका तोंडावर असल्‍यामुळे दंगली घडवून आणले जात आहेत का ? हे शोधून काढून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात मडुरा येथील शाळेचे छप्पर कोसळले

विद्यार्थ्यांच्या जिवाचीही काळजी नसलेल्या आणि त्यामुळे दुरुस्तीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर कडक कारवाई व्हायला हवी !