तासगाव (जिल्हा सांगली) – महाराष्ट्रात निवडणुका तोंडावर असल्यामुळे दंगली घडवून आणले जात आहेत का ? हे शोधून काढून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. पंतप्रधानांच्या कामांचा विरोधकांनी धसका घेतला आहे. मोदी यांनी पुन्हा सरकार स्थापन केले, तर सगळ्या समस्या संपणार आहेत. याच गोष्टीची भीती विरोधकांना आहे; म्हणूनच विरोधकांना पंतप्रधान मोदी यांची भीती वाटत आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केले. ते तासगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपचा विजयरथ कुणी रोखू शकत नाही ! – केशवप्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री, उत्तरप्रदेश
तासगाव (जिल्हा सांगली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नाही, तर देशभरात विकासकामांचा धडाका चालू आहे. या विकासाच्या बळावरच मोदी नावाची सुनामी येणार असून भाजपचा विजयरथ कुणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी केले. ते तासगाव येथे ‘मोदी अॅट द रेट ९’ या अभियानाच्या अंतर्गत कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी भाजपचे खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रभाकर पाटील, सुनील पाटील, दिग्विजय पाटील, अविनाश पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
केशवप्रसाद मौर्य पुढे म्हणाले, ‘‘सांगली जिल्ह्यासाठी केंद्रातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला गेला आहे. येत्या लोकसभेत आम्ही उत्तरप्रदेशातून सर्वाधिक ७५ पेक्षा अधिक खासदार संसदेत पाठवणार असून त्या खालोखाल ४५ खासदार महाराष्ट्रातून पाठवणार आहोत. मोदी पंतप्रधान झाल्यावर जगभरात भारताची प्रतिमा पालटली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनुयायी असून विकासकामांच्या बळावर आमची एकतर्फी सत्ता येईल.’’ मेळाव्याच्या अगोदर शहरातून काढलेल्या दुचाकी फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. केशवप्रसाद मौर्य यांनी तासगावच्या प्रसिद्ध श्री गणेशाचे दर्शन घेतले
उत्तर प्रदेश चे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री .केशवप्रसाद मौर्य जी तासगावकरांच्या भेटीलाhttps://t.co/T4yFSPw03t
भाजपाच्या वतीने तासगाव शहरातून @ 9 महासंपर्क अभियान रॅलीhttps://t.co/T4yFSPw03t@kpmaurya1
— Sanjaykaka Patil (@PatilSanjaykaka) June 12, 2023