परळी (जिल्‍हा सातारा) येथील प्राचीन महादेव मंदिराच्‍या परिसरात साकारणार बेलाचे वन !

सामाजिक वनीकरण आणि ग्रामस्‍थांचा सहभाग

श्रीक्षेत्र सज्‍जनगडच्‍या पायथ्‍याशी असणार्‍या परळी गावातील प्राचीन महादेव मंदिर

सातारा, १२ जून (वार्ता.) – येथील श्रीक्षेत्र सज्‍जनगडच्‍या पायथ्‍याशी असणार्‍या परळी गावातील प्राचीन महादेव मंदिराच्‍या परिसरात ग्रामस्‍थ आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्‍या वतीने बेलाचे वन साकारण्‍यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्‍या वनरक्षक साधना राठोड यांनी दिली. परळी येथील प्राचीन महादेव मंदिराला भेट दिल्‍यानंतर त्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांशी बोलत होत्‍या. या वेळी वनविभागातील अधिकारी, कर्मचारी, मंदिर विश्‍वस्‍त आणि ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.

साधना राठोड पुढे म्‍हणाल्‍या की, परळी येथील प्राचीन महादेव मंदिराला इतिहासात अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. या मंदिराला काही वर्षांपूवीच पुरातन विभागाच्‍या अधिकार्‍यांनी भेटी दिल्‍या आहेत. आता या मंदिराचे सुशोभीकरण होणार आहे.