गोवा : केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात चोरी

हिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! केपे तालुक्यातील गुडी-पारोडा येथील पर्वतावरील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थानात अज्ञात चोरट्यांनी घुसून दानपेटी बाहेर आणून फोडून रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली. काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !

‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषी-मुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

भारताचा ‘जीडीपी’ झाला ३.७५ ट्रिलियन डॉलर !

अमेरिकेतील ‘मूडीज’ या आर्थिक क्षेत्रातील जागतिक आस्‍थापनाच्‍या अंदाजानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्‍यवस्‍था ६ ते ६.३ टक्‍क्‍यांनी वधारेल.

चीन आणि पाकिस्‍तान यांची भारतापेक्षा वेगाने अण्‍वस्‍त्र निर्मिती !

जगात सध्‍या १२ सहस्‍त्र ५१२ अण्‍वस्‍त्रे आहेत. त्‍यांपैकी ९ सहस्‍त्र ५७६ अण्‍वस्‍त्रे ही आक्रमणास सज्‍ज आहेत. यांपैकी ३ सहस्‍त्र ८४४ अण्‍वस्‍त्रे ही क्षेपणास्‍त्रे आणि विमाने यांमध्‍ये बसवण्‍यात आली आहेत.

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्‍यास ते धर्माचरण करतील !

‘तमिळनाडूत अशी मान्‍यता आहे की, जेव्‍हा महिला गरोदर असते, तेव्‍हा तिने ‘रामायण’ आणि त्‍यामधील ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे. हे जन्‍माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे’, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्‍या राज्‍यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी केले आहे.

वीर सावरकर उवाच

यवनविजेत्या सम्राट चंद्रगुप्ताच्या राजमुद्रेने अंकित झालेले पान भारतीय इतिहासातील पहिले सोनेरी पान ठरते, त्याचप्रमाणे यवनांतक सम्राट पुष्यमित्राच्या राजमुद्रेने अंकित झालेले आपल्या भारतीय इतिहासातील जे पान तेच सोनेरी पान दुसरे!

गोरक्षकांना जी माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? कि मिळाली, तरी ते पैसे खाऊन गप्प बसतात ?

‘नवसारी (गुजरात) येथील दाभेल गावामध्ये गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणाऱ्या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद महंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.’ (११.६.२०२३)

विनामूल्य घेणे आणि देणे !

ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत ४० कि.मी. अंतरामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रेल्वे यांच्या जागेवर अनधिकृत झोपडपट्ट्या बांधल्या जात आहेत. पारसिक डोंगररांगा या गुन्हेगारीचे केंद्र झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांनी वेढल्या आहेत.